News Flash

पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत दोन महिने मोफत धान्य

५ किलो मोफत धान्य देण्याचा निर्णय

देशात करोनामुळे पुन्हा एकदा स्थिती चिंताजनक झाली आहे. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी अनेक राज्यांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. तर काही राज्यांनी कडक निर्बंध लादले आहेत. अशावेळी हातावर पोट असण्याऱ्यांसाठी सरकारनं एक पाऊल पुढे टाकलं आहे. गरीब जनतेची हेळसांड होऊ नये म्हणून पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मे आणि जून महिन्यात ५ किलो मोफत धान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेचा ८० कोटी नागरिकांना फायदा होणार आहे. या निर्णयामुळे गरीब जनतेला दिलासा मिळणार आहे. या योजनेवर केंद्र सरकार २६ हजार कोटी रुपये खर्च करणार आहे.

करोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या गरीबांच्या समस्या कमी करण्याच्या उद्देशाने सरकारने मार्च २०२० मध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज जाहीर केले होते. या पॅकेजअंतर्गत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतून दर महिन्याला दरडोई पाच किलो गहू अथवा तांदूळ मोफत देण्यात येत होतं. या योजनेतल्या जवळपास ८० कोटी लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य देण्यात आलं होतं. आता पुन्हा तीच स्थिती पुन्हा निर्माण झाली आहे. त्यामुळे संकटाच्या काळामध्ये पुन्हा एकदा सरकारनं दोन महिने मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे.

Oxygen Shortage: चीनचा मदतीचा हात; पण भारताची मात्र पाठ

नोव्हेंबर २०२० पासून केंद्र शासनानं पंतप्रधान गरीब कल्याण योजना बंद केली होती. आता लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना पुन्हा राबवल्यानं गरीब आणि गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2021 4:24 pm

Web Title: government provide free foodgrains under pm garib kalyan ann yojana rmt 84
Next Stories
1 माहिती न घेताच निधन झाल्याचं ट्विट करणाऱ्यांवर सुमित्रा महाजन संतापल्या; म्हणाल्या….
2 करोनामुळे स्वयंघोषित स्वामी नित्यानंद भयभीत; कैलासात येण्यावर घातले निर्बंध
3 “ऑक्सिजन प्लांट भारतीय लष्कराच्या हाती द्या”, मुख्यमंत्री केजरीवाल यांची पंतप्रधानांना सूचना
Just Now!
X