पेट्रोल व डिझेलवरचे कर कमी करण्याचा कुठलाही विचार नाही असे सरकारने सोमवारी लोकसभेत स्पष्ट केले.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले, की ‘कुठल्याही देशात पेट्रोल व डिझेलचे दर हे स्थिर नसतात.’ पेट्रोल व डिझेल हे वस्तू व सेवा कराअंतर्गत आणणार का या प्रश्नावर त्यांनी सांगितले, की ‘पेट्रोल व डिझेल आधीच जीएसटीच्या शून्य कर गटात आहेत, त्याचे दर जीएसटी मंडळाने ठरवायचे आहेत.’ जीएसटी मंडळात अर्थमंत्री अध्यक्ष असून राज्यांचे अर्थमंत्री हे सदस्य आहेत. ‘सध्यातरी पेट्रोल व डिझेलवरचे कर कमी करण्याचा कुठलाही प्रस्ताव नाही’, असे सांगून सीतारामन म्हणाल्या,की असे असले तरी पेट्रोल व डिझेलवर कु ठलाही नवीन कर लावण्याचा मात्र विचार नाही.

पेट्रोल व डिझेलवर केंद्र सरकार अबकारी व सीमा शुल्क लावत असते व त्याशिवाय राज्यांचे इतर कर वेगळे असतात. डिझेलमध्ये छोटय़ा शेतकरम्य़ांना अनुदान देणार का, असे विचारले असता त्यांनी सांगितले, की  ‘यात केंद्र व राज्यांचे कर वेगवेगळ्या पातळ्यांवर लावलेले असतात.’