28 October 2020

News Flash

मदत खर्चाबाबत सरकारचे मौन

अधिक वित्तीय प्रोत्साहनाबाबत अस्पष्टताच

(संग्रहित छायाचित्र)

पी. वैद्यनाथन अय्यर

अधिक वित्तीय प्रोत्साहन देण्याची गरज आणि त्याची वेळ याबाबत आपण खुल्या मनाने विचार करण्यास तयार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २६ सप्टेंबरला ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सांगितले होते. मात्र पंतप्रधानांची आर्थिक सल्लागार परिषद (ईएसी), निती आयोग आणि मुख्य आर्थिक सल्लागारांचे (सीईए) कार्यालय यांच्यासह तज्ज्ञ संस्थांमधील बेचैनीची वाढती जाणीव लक्षात घेता ही हमी पुरेशी नसल्याचे दिसते.

वित्तीय प्रोत्साहन लवकरात लवकर दिल्यास कृषी व श्रम क्षेत्रांमध्ये केल्या जात असलेल्या मोठय़ा सुधारणांचा अधिक चांगल्या रीतीने फायदा घेणे भारताला शक्य होईल, याबाबत या संस्थांमधील धोरणांवर प्रभाव टाकणाऱ्यांचे एकमत असतानाही, अधिक खर्च करण्याबाबत सरकार नाखुशी दाखवत असल्यामुळे अनेक जण गोंधळलेले आहेत.

जूनअखेर आणि जुलैची सुरुवात या दरम्यान पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली किमान ४ बैठका झाल्या. ईएसी, निती आयोग आणि सीईए कार्यालयाच्या सदस्यांनी यावेळी सादरीकरण केले. पंतप्रधान कार्यालय, अर्थमंत्रालय आणि वाणिज्य मंत्रालय यांतील वरिष्ठ अधिकारी या बैठकांत सहभागी झाले होते, असे इंडियन एक्स्प्रेसला कळले आहे.

‘‘दोन पैलूंबद्दल अभिप्रायांवर जवळजवळ सहमती होती. एक म्हणजे आर्थिक विस्तार किंवा वाढीव खर्च आणि दुसरे सार्वजनिक क्षेत्रांतील बँकांतील भागभांडवलाच्या विक्रीसह वित्तीय क्षेत्रातील सुधारणा. अमित शहा, निर्मला सीतारामन, पीयूष गोयल, रविशंकर प्रसाद आणि गजेंद्रसिंह शेखावत हे महत्त्वाचे मंत्री बैठकीला हजर होते. यातील संदेश स्पष्ट होता- मोदी हे खर्चाबाबत मंत्रिमंडळात राजकीय सहमती साधत असल्याचे दिसत होते,’’ असे या बैठकीला हजर असलेल्या आणि आपली ओळख उघड न करू इच्छिणाऱ्या एका व्यक्तीने सांगितले.

बैठकीत काय झाले ? : वित्तीय प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने काही विशिष्ट कल्पना या वेळी राजकीय नेतृत्वापुढे सादर करण्यात आल्या. कामगारांना कुठल्यातरी प्रकारचे वेतन अनुदान, ग्रामीण घरबांधणी- भारताच्या सुमारे ७०० जिल्ह्य़ांमध्ये हजाराहून अधिक घरांचे बांधकाम, ज्या जिल्हा खंडांमध्ये रुग्णालये नाहीत, तेथे १०० खाटांची रुग्णालये उभारणे आणि सहा महिन्यांची नागरी नोकरी हमी योजना यांचा त्यात समावेश होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 2, 2020 12:37 am

Web Title: government silence on aid spending abn 97
Next Stories
1 बलरामपूरमधील पीडितेचाही मृत्यू
2 चांदोबाचे चित्रकार के. सी. शिवशंकर कालवश
3 ब्रेग्झिट विधेयकावरून ‘ईयू’ची ब्रिटनविरुद्ध कायदेशीर कारवाई
Just Now!
X