25 May 2020

News Flash

महिला पत्रकाराचे गाल थोपटणाऱ्या राज्यपालांनी मागितली माफी

तुम्ही मला माझ्या नातीसारख्या वाटलात. त्यामुळेच मी तुमचे गाल थोपटले. मी स्वतः 40 वर्ष पत्रकारिता केलेली आहे. त्यामुळे...

विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्याऐवजी महिला पत्रकाराचे गाल थोपटणारे तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी अखेर माफी मागितली आहे. ”तुम्ही मला माझ्या नातीसारख्या वाटलात. त्यामुळेच मी तुमचे गाल थोपटले. मी स्वतः 40 वर्ष पत्रकारिता केलेली आहे. त्यामुळे आपल्या पत्रकारितेचे कौतुक करण्याचा माझा हेतू होता. मात्र झाल्या प्रकाराने तुम्ही दुःखी झाल्याचं तुमच्या ईमेलवरुन समजलं. आपल्या भावना दुखावल्या असल्यास मी आपली माफी मागतो”, असं बनवारीलाल पुरोहित यांनी महिला पत्रकार लक्ष्मी सुब्रह्मण्यम यांना पाठवलेल्या आपल्या माफीनाम्यात म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण –
तामिळनाडूच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या सेक्स फॉर डिग्री प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाहीये. विनाकारण आपले नाव यामध्ये गोवले जातेय, हे सांगण्यासाठी तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी मंगळवारी संध्याकाळी पत्रकार परिषद घेतली होती. पण ही पत्रकार परिषदेत संपवताना त्यांनी एक विचित्र कृती केली, त्यामुळे ते वादात सापडले. ज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांना त्यांच्याजवळ उभ्या असलेल्या एका महिला पत्रकराने प्रश्न विचारला. त्यावेळी राज्यपालांनी प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी त्या महिला पत्रकाराच्या संमतीविना तिच्या गालाला स्पर्श केला व गाल थोपटले. राज भवनात बोलवलेली ही पत्रकार परिषद आटोपून ते निघत असताना ही घटना घडली. यावेळी त्यांच्याभोवती पत्रकारांचा गराडा होता.  त्यानंतर पत्रकार लक्ष्मी सुब्रमण्यम यांनी टि्वटवरुनही आपला संताप व्यक्त केला होता. मी माझा चेहरा वारंवार धुतला. पण अजूनही त्या स्पर्शापासून मुक्ती मिळालेली नाही. तुमच्यादृष्टीने ही कृती कौतुकाची असेल, पण माझ्यासाठी तुम्ही चुकीचेच आहात असे या टि्वटमध्ये लक्ष्मी यांनी म्हटले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2018 9:29 pm

Web Title: governor banwarilal purohit apologizes for touching cheeks of lady journalist
Next Stories
1 Jio की Airtel ? कोणाचा 4G स्पीड आहे ‘एक नंबर’ ?
2 मित्राच्या ‘त्या’ एका वाक्यामुळे सचिन मुंबईच्या रस्त्यावर खेळला क्रिकेट
3 VIDEO: ग्राहकांना जगावेगळी सेवा देणारे हे १० चित्रविचित्र रेस्तराँ पाहिलेत का?
Just Now!
X