राज्यपालांनी मंत्रिमंडळाचा चौथा प्रस्ताव स्वीकारला

जयपूर : राजस्थान विधानसभेचे अधिवेशन बोलावण्यासाठीचा अशोक गेहलोत मंत्रिमंडळाचा प्रस्ताव राज्यपाल कलराज मिश्र यांनी बुधवारी स्वीकारला. विधानसभेचे  अधिवेशन १४ ऑगस्टला घेण्यास राज्यपालांनी संमती दिली आहे.

Narayan Rane, Vinayak Raut,
रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये ‘कडवट’ माजी-आजी शिवसैनिकांमध्ये लढत
narendra modi
“जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेची निवडणूक होणार, राज्याला लवकरच…”, पंतप्रधान मोदींच्या तीन मोठ्या घोषणा
Deadline for drain cleaning in Pune till May 10 Municipal Commissioners order
पुण्यात नालेसफाईसाठी १० मेपर्यंत मुदत, महापालिका आयुक्तांचा आदेश
Sudhir Mungantiwar-Kishore Jorgewar reunion Will campaign in the Lok Sabha elections
सुधीर मुनगंटीवार-किशोर जोरगेवार यांचे मनोमिलन; लोकसभा निवडणुकीत प्रचार करणार

विधानसभा अध्यक्ष सी.पी.जोशी तसेच राज्यपाल मिश्रा यांच्या भेटीनंतर हा निर्णय झाला आहे. अधिवेशन बोलावण्याबाबतचा प्रस्ताव राज्यपालांनी यापूर्वी तीन वेळा परत पाठवला आहे.

मंत्रिमंडळाने २३ जुलैला पहिल्यांदा असा प्रस्ताव पाठवला होता. विधानसभा अधिवेशनाचा विषय विश्वासदर्शक ठराव संमत करणे हा असल्यास ते अल्पसूचनेवरून बोलावले जाऊ शकते; अन्यथा २१ दिवसांची नोटीस आवश्यक आहे, असे राज्यपालांनी सरकारचे यापूर्वीचे प्रस्ताव नाकारताना म्हटले होते. हे अधिवेशन ३१ जुलैला सुरू व्हावे असा आग्रह सरकारने यापूर्वी धरला होता.

सचिन पायलट यांच्या बंडाने राजस्थानमधील अशोक गेहलोत सरकार अडचणीत आहे. पायलट यांच्या पाठिशी काँग्रेसचे १८ बंडखोर आमदार आहेत. दोनशे सदस्य असलेल्या राजस्थान विधानसभेत गेहलोत यांनी काँग्रेसच्या पाठिशी १०७ आमदार असल्याचा दावा केला  आहे. तर प्रमुख विरोधीपक्ष असलेल्या भाजपकडे ७२ सदस्य आहेत.

अधिवेशन बोलावण्याच्या मुद्यावरून पेचप्रसंग तीव्र झाल्यानंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मिश्र यांची राजभवनात सुमारे १५ मिनिटे भेट घेतली. यानंतर काही तासांनी हा प्रस्ताव पुन्हा तयार करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होऊन नवी तारीख ठरवण्यात आली. आता १४ तारखेला अधिवेशन होणे अपेक्षित आहे.