रिपब्लिकन पक्षासाठी उपाध्यक्षपदासाठी भारतीय वंशाच्या अमेरिकी महिला व दक्षिण कॅरोलिनाच्या गव्हर्नर निक्की हॅले याच योग्य आहेत असे वातावरण निर्माण झाले असले तरी श्रीमती हॅले यांनी मात्र आपण उपाध्यक्षपदाच्या शर्यतीत नसल्याचे म्हटले आहे.
श्रीमती हॅले यांनी सांगितले की, आपण याच आठवडय़ात फ्लोरिडाचे सिनेटर मार्को रुबियो यांना अध्यक्षपदासाठी पाठिंबा दिला आहे. सध्या मी दक्षिण कॅरोलिनाची गव्हर्नर आहे व दोन मुलांची आई आहे त्यामुळे या जबाबदाऱ्या माझ्यासाठी पुरेशा आहेत. मी समाधानी आहे, असे त्यांनी फॉक्स न्यूजला सांगितले. रुबियो-हॅले ही जोडी रिपब्लिकन पक्षासाठी योग्य आहे, असे प्रसारमाध्यमांनी म्हटले होते.