News Flash

‘अल कायदा’ आणि ‘आयसिस’च्या नव्या संघटनांवर केंद्र सरकारने आणली बंदी

या संघटना वैश्विक जिहादसाठी भारतीय तरुणांना कट्टरवादी बनवून त्यांना आपल्याच देशाविरोधात दहशतवादी कारवायांसाठी उद्युक्त करतात.

प्रतिकात्मक छायाचित्र

‘अल कायदा’ आणि ‘आयसिस’ या दहशतवादी संघटनांच्या नव्या संघटनांना बेकायदा ठरवत केंद्र सरकारने प्रतिबंध लावले आहेत. यामध्ये ‘अल कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेन्ट’ आणि ‘अफगाणिस्तामधील इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅण्ड शाम खुरासन’ या संघटनांचा समावेश आहे. या संघटना वैश्विक जिहादसाठी भारतीय तरुणांना कट्टरवादी बनवून त्यांना आपल्याच देशाविरोधात दहशतवादी कारवायांसाठी उद्युक्त करतात, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे.

केंद्राच्या आदेशात म्हटले आहे की, आयसिस-के या संघटनेला इस्लामिक स्टेट इर खुरासन प्रोविन्स (आयएसकेपी) तसेच आयएसआयएस विलायत खुरासन या नावानेही ओळखले जाते. त्याचबरोबर अल कायदाशी संबंधीत असलेले AQIS ही संघटनाही एक दहशतवादी संघटना आहे. या संघटनेने आपल्या शेजारी देशात दहशतवादी कृत्ये केली आहेत. तसेच भारतीय उपखंडात भारताविरोधात दहशतवादी कृत्यांना प्रोत्साहन देण्याचे काम ही संघटना करते.

या संघटना कट्टरवाद पसरवताना भारतातील तरुणांना आपल्या संघटनेत भरती करण्यासाठी प्रयत्नशील असतात. या संघटनांना बेकायदा कृत्ये प्रतिबंधक कायद्यांतर्गत प्रतिबंधित संघटना म्हणून घोषित करण्यात आले आहे. या संघटना वैश्विक जिहादच्या नावाखाली तरुणांना आपल्याकडे आकृष्ट करीत आपली मुळे मजबूत करण्याचे काम करीत आहेत. तसेच लोकशाही मार्गाने निवडून आलेली सरकारे उखडून फेकून देऊन स्वतःचा खलीफा स्थापन करण्यासाठी दहशतवादी कृत्ये घडवून आणत आहेत, असेही केंद्र सरकारने म्हटले आहे.

देशातील तरुणांमध्ये कट्टरवाद निर्माण होणे हे राष्ट्रहित आणि आंतरराष्ट्रीय शांतीसाठी गंभीर चिंतेचा विषय आहे. त्यामुळे बेकायदा कृत्ये प्रतिबंद कायद्याअंतर्गत या संघटनांवर कारवाई करण्यात आली असून अशा प्रतिबंधित संघटना आणि त्यांच्या सदस्यांविरोधात कारवाईसाठी या कायद्यात कठोर शिक्षेची तरतुद आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2018 8:55 pm

Web Title: govt bans new offshoots of al qaeda isis under anti terror law
Next Stories
1 पतिची हत्या केल्याने ऑस्ट्रेलियाच्या कोर्टाकडून केरळमधील महिलेला २२ वर्षांचा तुरुंगवास
2 अतिरेक्यांचे दिवस भरले! स्नायपर्स, रडार, एनएसजी कमांडो काश्मीरमध्ये दाखल
3 फिगर राखण्यासाठी महिला टाळतात स्तनपान – आनंदीबेन पटेल
Just Now!
X