सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधीवरील PPF व्याजदरात शुक्रवार केंद्र सरकारने कपात केली. पीपीएफवरील व्याजदर ८.७ टक्क्यांवरून ८.१ टक्क्यापर्यंत खाली आणण्यात आले आहे. त्याचबरोबर किसान विकास पत्रावरील व्याजदरही कमी करण्यात आला आहे. आतापर्यंत किसान विकास पत्रावर वार्षिक ८.७ टक्के व्याज देण्यात येत होते. आता त्यावर वार्षिक ७.८ टक्के व्याज देण्यात येणार आहे.