अल कायदाने दिलेली धमकी फारशी गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. खूप काही गोष्टी बोलल्या गेल्या आहेत. पण उत्तर देऊन आम्हाला त्यांना महत्व द्याचे नाही असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी गुरुवारी सांगितले.

आम्ही अशा धमक्या ऐकत असतो पण त्यांना गांभीर्याने घेत नाही. आमचे सैन्यदल शस्त्रास्त्राने सुसज्ज असून देशाला अखंड ठेवण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहे असे रवीश कुमार अल कायदाच्या धमकीच्या विषयावर बोलताना म्हणाले.

काय म्हणाला अल जवाहिरी
‘Don’t Forget Kashmir’ (काश्मीरला विसरू नका) या नावाने संदेश देत केवळ भारतालाच इशारा दिला नाही, तर त्याने भारतात दहशतवाद पसरवणाऱ्या दहशतवाद्यांचे आणि त्यांच्या कृत्यांचे समर्थनही केले आहे.

अल कायदाच्या मीडिया शाखेने जारी केलेल्या संदेशात दहशतवादी मुसाचेही छायाचित्र लावण्यात आले आहे. काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवणाऱ्या दहशतवाद्यांसमोर येऊन त्यांना समर्थन देणे आणि त्यांचे समर्थन घेणे हा त्यामागचा अल जवाहिरीचा हेतू असल्याचे स्पष्ट आहे. दरम्यान, त्याने आपल्या संदेशात पाकिस्तानवरही टीका केली.

दहशतवाद्यांना त्याने जिहादी असे संबोधले आहे. तसेच काश्मीरमध्ये लढणाऱ्या जिहादींनी पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांच्या तावडीतून मुक्त झाले झाले पाहिजे. तसेच शारीया कायद्यानुसार त्यांनी आपली धोरणे तयार केली पाहिजे, असेही त्याने संदेशात म्हटले आहे. तसेच त्याने दहशतवादाला समर्थन देत त्याला प्रोत्साहन दिल्याचे समोर आले आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणांच्याविरोधात लढण्यासाठी अल कायदा दहशतवाद्यांचा एक समूह तयार करण्याच्या प्रयत्न करत आहे. दरम्यान, आपल्या विचारांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे नुकसान होईल आणि भारताला उपकरणे, सैनिकांच्या कमतरतेचा सामना करावा लागेल, असेही त्याने आपल्या संदेशात म्हटले आहे.