मणिपूरमध्ये अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात २० लष्करी जवान हुतात्मा झाल्याच्या घटनेचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) देण्यात आला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. मणिपूर हल्ला हा अलीकडच्या काळातील सर्वात भीषण हल्ला होता व त्यामुळेच त्याचा तपास एनआयएकडे देण्यात आला आहे. गुरुवारी मणिपूरमधील चंडेल जिल्ह्य़ात करण्यात आलेल्या हल्ल्यात लष्कराचे २० जवान हुतात्मा झाले होते, तर ११ जण जखमी झाले होते.