News Flash

गव्हाच्या MSP मध्ये फक्त २ टक्क्यांनी वाढ ; एक दशकातील सर्वात कमी

गव्हाच्या एमएसपीमध्ये प्रति क्विंटल ४० रुपयांची वाढ करण्यात आली आहे

narendra modi
सरकारने शेतकऱ्यांसाठी घोषणा देखील केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक झाली. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत मंत्रिमंडळात घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. सरकारने शेतकऱ्यांसाठी घोषणा देखील केली आहे. केंद्र सरकारने चालू पीक वर्षासाठी गहू आणि मोहरीच्या किमान आधारभूत किंमतीत (MSP) वाढ करण्याची घोषणा केली आहे. सरकारने गव्हाच्या एमएसपीमध्ये फक्त २.०३ टक्के वाढ केली, जी गेल्या १२ वर्षातील सर्वात कमी आहे.

गव्हाच्या एमएसपीमध्ये प्रति क्विंटल ४० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. वाढ झाल्यानंतर गहू किमान २,०१५ रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी केला जाईल. या व्यतिरिक्त मोहरीचा एमएसपी ४०० रुपये प्रति क्विंटलने वाढवून ५,०५० रुपये करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

हरभऱ्याची आधारभूत किंमतीत १३० रुपयांनी वाढ करुन ती ५,२३० रुपये प्रति क्विंटल झाली आहे. मसूरच्या आधारभूत किंमतीमध्ये ४०० रुपयांनी वाढ केल्यानंतर ती प्रति क्विंटल ५,५०० रुपयांवर गेली आहे. कुसूम फूलाची आधारभूत किंमती ११४ रुपयांनी वाढवून ५,४४१ रुपये प्रति क्विंटल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच जव ची एमएसपी ३५ रुपयांनी वाढवून १६३५ रुपये प्रति क्विंटल करण्यात आला आहे.

photo : pib.gov.in

जाणून घ्या: शेतकरी आंदोलनाचं मूळ असलेलं MSP म्हणजे काय?

ज्या किंमतीवर सरकार शेतकऱ्यांकडून पीक खरेदी ते किंमत म्हणजे किमान आधारभूत किंमत (MSP). मोदी सरकारने एमएसपी वाढवण्याचा निर्णय अशा वेळी घेतला आहे. जेव्हा शेतकऱ्यांनी नवीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन तीव्र केले आहे. अलीकडे, शेतकरी संघटनांनी उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये महापंचायत आयोजित केली आहे. काही महिन्यांनी उत्तर प्रदेश, पंजाबसह ५ राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये भाजपला शेतकऱ्यांच्या नाराजीला सामोरे जावे लागू शकते, त्यामुळे हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2021 5:22 pm

Web Title: govt hikes wheat msp by 2 percent for 2021 22 crop year farmer narendra modi srk 94
Next Stories
1 Covid 19: दुसऱ्या लाटेत सर्व मृत्यू निष्काळजीपणामुळे झाल्याचं गृहित धरू शकत नाही – सुप्रीम कोर्ट
2 प्रेमविवाह केल्याच्या रागातून सासरच्या मंडळींनी दगडाने ठेचून केली तरुणाची हत्या
3 माकडांपासून वाचण्यासाठी भाजपा नेत्याच्या पत्नीने दुसऱ्या मजल्यावरुन मारली उडी; जागीच मृत्यू
Just Now!
X