28 September 2020

News Flash

अनलॉक ४ : मेट्रोसह सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांना परवानगी; शाळा, महाविद्यालये राहणार बंद

असे असतील नियम

(संग्रहित छायाचित्र)

करोनामुळे लागू करण्यात आलेला लॉकडाउन हळूहळू शिथिल केला जात असुन, अनलॉक ३ चा टप्पा ३१ ऑगस्टला संपत असल्यानं केंद्र सरकारकडून अनलॉक ४ मध्ये नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. अनलॉक ४ मध्ये केंद्र सरकारनं धार्मिक सांस्कृतिक, राजकीय, मनोरंजन कार्यक्रमांना परवानगी दिली आहे. तर शाळा, महाविद्यालये तूर्तास बंद ठेवण्यात आली आहेत. परवानगी देण्यात आलेल्या कार्यक्रमांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत.

अनलॉक ४ साठीच्या मार्गदर्शक सूचना आज केंद्रीय गृहमंत्रालयानं जाहीर केल्या आहेत. अनलॉक ४ मध्ये केंद्र सरकारनं मेट्रो सेवा सुरू करण्यासह सामाजिक, क्रीडा, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय व धार्मिक सभा घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. २१ सप्टेंबरपासून राज्यात हे कार्यक्रम घेता येणार असून, त्यासाठी काही बंधन घालण्यात आली आहेत.

गृहमंत्रालयानं जाहीर केलेल्या मार्गदर्शक एकाच छताखाली होणाऱ्या या कार्यक्रमांमध्ये केवळ १०० लोकांनाच सहभागी होता येणार आहे. त्याचबरोबर अशा कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांना तोंडावर मास्क, सोशल डिस्टन्सिगचं पालन, थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझर यांचा वापर करणे अनिवार्य असणार आहे. त्याचबरोबर करोनासंदर्भात सरकारनं जाहीर केलेल्या इतर नियमाचं पालन करण्यात यावं, असंही केंद्र सरकारनं म्हटलं आहे.

हे राहणार बंद…

अनलॉक ४ मध्ये केंद्र सरकार चित्रपटगृह खुली करण्यास परवानगी देण्याची अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्याचबरोबर शाळा, महाविद्यालयांच्या बाबतीतही निर्णय घेतला जाण्याची शक्यता होती. मात्र, चित्रपटगृहांसह स्विमिंग पूल (जलतरण तलाव), आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान सेवा (विशेष विमान सेवा वगळून) सप्टेंबरमध्येही बंदच राहणार आहे. राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांशी चर्चा केल्यानंतर केंद्र सरकारनं शाळा महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2020 7:55 pm

Web Title: govt of india announces guidelines for unlock 4 bmh 90
टॅग Coronavirus
Next Stories
1 NEET-JEE : “जर मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केला नाही, तर मी पंतप्रधानांची भेट घेईल”
2 लखनौ हादरलं! योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानाजवळ रेल्वे अधिकाऱ्याच्या पत्नीसह मुलाची गोळ्या घालून हत्या
3 घुसखोरीचा मोठा डाव उधळला; BSF ला भारत-पाक सीमेजवळ सापडला २५ फूट खोल बोगदा
Just Now!
X