News Flash

मजुरी आणि निवृत्तिवेतनही थेट लाभार्थ्यांपर्यंत देणार

थेट अनुदान योजनेनंतर आता केंद्र शासन ‘थेट घरापर्यंत’ (डिरेक्ट टू होम) योजना कार्यान्वित करण्याच्या विचारात आह़े

| February 5, 2014 01:36 am

थेट अनुदान योजनेनंतर आता केंद्र शासन ‘थेट घरापर्यंत’ (डिरेक्ट टू होम) योजना कार्यान्वित करण्याच्या विचारात आह़े  या योजनेनुसार निवृत्तिवेतन, मजुरी आदींसारख्या सुविधाही देशभरातील लाभार्थ्यांपर्यंत थेट पोहोचविण्यात येणार आहेत़  या योजनेला आंध्र प्रदेशातून सुरुवात करण्यात आल्याची माहिती केंद्रीय ग्रामविकासमंत्री जयराम रमेश यांनी मंगळवारी दिली़
कल्याणकारी योजनांसाठी देण्यात येणारे अनुदान लाभार्थ्यांपर्यंत पोहोचताना मधल्यामध्ये झिरपत असल्याचे शासनाच्या लक्षात आल़े  त्यामुळे हा कार्यक्रम राबविण्याची आवश्यकता वाटल्याचेही रमेश म्हणाल़े  अन्न सुरक्षा असो, आरोग्य योजना असोत, निवृत्तिवेतन योजना असोत किंवा नरेगा असो, प्रत्येक योजनेमध्ये निधी मध्येच गायब होण्याचे प्रमाणच अधिक आह़े  तुम्ही एखादा उपक्रम हाती घेता; त्यासाठी मुबलक निधीसुद्धा तुमच्याकडे आह़े, परंतु हा पैसा प्रत्यक्ष लाभार्थ्यांपुढे किती पोहोचतो हा मोठा प्रश्नच आहे, असेही जयराम म्हणाल़े
हा पैशाचा प्रश्न नाही, तर निधी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या यंत्रणेतील बदलांचा प्रश्न आह़े  गेल्या वर्षभरात आम्ही या यंत्रणेत बँका आणि टपाल खात्याला समाविष्ट करून मूलभूत बदल घडविण्याचे प्रयत्न करत आहेत़  हे सांगताना मला अत्यानंद होत आहे की, आंध्र प्रदेश आणि झारखंडमध्ये आम्ही टपाल खात्याच्या साहाय्याने निवृत्तिवेतन, प्रसूती साहाय्य निधी, शिष्यवृत्ती, मजुरी आदी थेट कुटुंबापर्यंत पोहोचवू शकणार आहोत़  आंध्र प्रदेशात याची सुरुवात झाली आहे, झारखंडमध्ये लवकरच होणार आह़े  त्यानंतर काही काळातच देशातील इतर राज्यांतही ही योजना लागू करण्यात येईल, असेही रमेश यांनी सांगितल़े  येथे निमलष्करी दलाच्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही माहिती दिली़  
येत्या दोन वर्षांत थेट लाभार्थ्यांच्या हातात अनुदान योजना देशभर कार्यरत होईल, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला़

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2014 1:36 am

Web Title: govt plans dth scheme to pay subsidy directly to beneficiaries
टॅग : Jairam Ramesh
Next Stories
1 राजीव गांधी हत्या खटला : आरोपींच्या याचिकेवरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला
2 मायक्रोसत्या : सत्या नाडेला मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी
3 ओबामासुद्धा मोदींचे भाषण ऐकतात तेव्हा..
Just Now!
X