News Flash

सरकारकडून व्हॉट्स अॅपला दुसरी नोटीस, कायदेशीर कारवाईचा इशारा

अन्यथा ज्या माध्यामातून अफवा पसरवल्या जात आहेत त्यांनाही दोषी मानलं जाईल, सरकारचा इशारा

केंद्र सरकारने लोकप्रीय इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्स अॅपला दुसऱ्यांदा नोटीस पाठवली असून अफवांना व चिथावणीखोर मेसेजेसना थांबवण्यासाठी प्रभावी पावलं उचलण्यास सांगितलं आहे. अन्यथा ज्या माध्यामातून अफवा पसरवल्या जात आहेत त्यांनाही दोषी मानलं जाईल आणि त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई केली जाईल असं या नोटीसमध्ये सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

देशभरात चिथावणीखोर मेसेजमुळे जमावाकडून निर्दोष लोकांच्या हत्या होण्याचं प्रमाण वाढत आहे. ही गंभीर बाब असून हे रोखण्यासाठी जबाबादारीने काही मोठ्या उपाययोजना करण्याची गरज आहे. अशाप्रकारच्या घटना ज्या माध्यमाद्वारे होत आहेत ते आपल्या जबाबदारीपासून पळ काढू शकत नाहीत, जर ते मूकदर्शक बनून राहणार असतील तर त्यांनाही दोषी मानलं जाईल आणि त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई केली जाईल असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

यापूर्वीही सरकारने व्हॉट्स अॅपला चिथावणीखोर आणि फेक मेसेज रोखण्याचा इशारा दिला होता. व्हॉट्स अॅपवर पसरवण्यात येणाऱ्या अफवांना व चिथावणीखोर मेसेजेसना थांबवण्याची जबाबदारी कोणाची असा प्रश्न केंद्र सरकारनं इन्स्टंट मेसेजिंग अॅप कंपनीला विचारला होता. व्हॉट्स अॅपनं यासंदर्भात सरकारकडे खुलासा करत हिंसेच्या अघोरी घटनांनी आम्हीदेखील व्यथित झाल्याचं म्हटलं होतं. तसेच या समस्येवर लगेच काहीतरी तोडगा काढावा अशी आमचीही इच्छा असल्याचं व्हॉट्स अॅपनं सरकारला पाठवलेल्या पत्रात म्हटलं होतं. त्यानंतर व्हॉट्स अॅपने पहिल्यांदाच देशातील मुख्य वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात देऊन नागरिकांना जागरुक करण्याचा प्रयत्न केला होता. वर्तमानपत्रांमध्ये दिलेल्या जाहिरातीत व्हॉट्स अॅपकडून खोट्या मेसेजपासून सावध राहण्याच्या 10 टीप्सही देण्यात आल्या, तसंच फॉरवर्डेड मेसेज ओळखण्यासाठी एक फिचरही सुरू केलं मात्र तरीही अशा घटनांना आळा बसलेला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 20, 2018 1:55 am

Web Title: govt sends second notice to whatsapp to prevent fake news
Next Stories
1 प्रसिद्ध गीतकार आणि कवी गोपालदास नीरज यांचं निधन , एम्समध्ये घेतला अखेरचा श्वास
2 संसदेवर पुन्हा दहशतवादी हल्ल्याचा कट?
3 सभापती संतापल्या!
Just Now!
X