कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेच्या विश्वस्तांची बुधवारी बैठक होणार आहे. यामध्ये किमान एक हजार रुपये निवृत्तिवेतन देण्याचा निर्णय अपेक्षितआहे. त्यामुळे २८ लाख निवृत्तिवेतनधारकांना लाभ होणार आहे.याखेरीज कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीची शिखर संस्था असलेले केंद्रीय विश्वस्त मंडळ १९५२ च्या भविष्यनिर्वाह निधी योजनेतील मासिक किमान वेतनाची १५ हजार रुपयांची मर्यादा वाढवण्याबाबत निर्णय घेणार आहेत. यामुळे विविध योजनांतर्गत आणखी कर्मचाऱ्यांना यामध्ये समावेश करता येईल. सध्या मूळ वेतन, महागाई भत्ता मिळून ६५०० रुपये ज्या व्यक्तीला वेतन मिळते, त्याचा कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संस्थेत समावेश केला जातो.