23 January 2021

News Flash

..तर २०१९ च्या निवडणुकीत भाजपाचा प्रचार करू: अरविंद केजरीवाल

जर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आला तर भाजपाला दिल्लीतील प्रत्येक मत मिळवून देण्याची जबाबदारी घेऊ.

दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा देण्यासाठी आप सरकारकडून दाखल करण्यात आलेला प्रस्ताव आज (सोमवार) विधानसभेत मंजूर करण्यात आला. दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा मिळाला तर २०१९ च्या निवडणुकीत आपण भाजपासाठी प्रचार करू अशी घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली. उल्लेखनीय म्हणजे दिल्लीच्या प्रशासकीय कामकाजावरून दिल्ली सरकार आणि नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्यात सध्या तणावाचे वातावरण आहे. याचदरम्यान सरकारने संपूर्ण राज्याचा दर्जा देण्याची आपली जुनी मागणी पुन्हा एकदा पुढे केली आहे.

केजरीवाल विधानसभेत म्हणाले की, मी भाजपाला सांगू इच्छितो की, जर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आला तर तुम्हाला दिल्लीतील प्रत्येक मत मिळवून देण्याची जबाबदारी घेऊ. आम्ही सर्वजण तुमचा प्रचार करू. जर तुम्ही असे केले नाही तर दिल्लीतील जनता ‘भाजपा दिल्ली छोडो’चे फलक घेऊन फिरतील.

दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणीचा मुद्दा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. यासाठी आपने ३०० हून अधिक सभा घेण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे भाजपाबरोबर काँग्रेसनेही आपच्या या मागणीवर टीका केली आहे. काम न करण्यासाठीचे हे कारण असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2018 8:36 pm

Web Title: grant statehood to delhi will campaign for you in 2019 elections arvind kejriwal tells bjp
टॅग Arvind Kejriwal
Next Stories
1 ‘ती’ नोटीस जारी झाली तर १९० देशाच्या पोलिसांना मिळणार नीरव मोदीला अटक करण्याचा अधिकार
2 वाजपेयींच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी एम्समध्ये
3 पती-पत्नीच्या चारित्र्यावर निराधार शंका उपस्थित करणे क्रूरता: हायकोर्ट
Just Now!
X