सरकार सर्व प्रकारचे अनुदान बंद करणार नाही, तर ते खऱ्या गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न करेल, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेचे जीवन बदलून टाकणाऱ्या सुधारणा करण्याचे आश्वासन दिले.
अनावश्यक नियंत्रणे हटवण्यात येतील आणि स्रोतांचे वाटप करण्यात सक्षमता आणली जाईल असे आश्वासन देतानाच, नागरिकांना विकास करण्यासाठी नव्या संधी निर्माण केल्या जातील अशी हमीही मोदी यांनी ‘इकॉनॉमिक टाइम्स ग्लोबल बिझिनेस समिट’मध्ये भाषण करताना दिली.
सर्वच अनुदान चांगले आहे असे माझे म्हणणे नाही, मात्र अशा मुद्दय़ांवर कुठलीही आदर्श परिस्थिती असू शकत नाही. आपल्याला वास्तववादी असायला हव, असे मोदी म्हणाले.