अवकाशातील शोधक दुर्बीणींमध्ये गुरूत्वीय लहरींचे अवकाश व काळातील तरंग पकडून त्यांच्या मदतीने विश्वातील मोठी कृष्णविवरे कशी तयार झाली असावीत याचा अभ्यास करणे शक्य आहे, असे वैज्ञानिकांचे मत आहे,

ब्रिटनमधील डय़ुरहॅम विद्यापीठाच्या वैज्ञानिकांच्या मार्गदर्शनाखाली काही वैश्विक परिणामांची सादृश्यीकरण करण्यात आले. त्यांचा वापर महाकाय कृष्णविवरांच्या टकरीतून जास्त वेगाने निर्माण होणाऱ्या गुरूत्वाय तरंगांचे भाकीत करता येते. तरंगलांबी व कंप्रता यावरून कोणत्या प्राथमिक वस्तुमानाच्या बीजापासून १३ दशलक्ष वर्षांपूर्वी ही कृष्णविवरे बनली आहेत हे समजू शकते व त्यातून ही कृष्णविवरे का तयार झाली व कशी व कुठे तयार झाली या माहितीवर प्रकाश पडू शकेल. इगल प्रोजेक्टमधील सादृश्यीकरणातून विश्वातील काही घटना संगणकावर प्रारूपच्या मदतीने तयार करण्यात आल्या. त्याचा उपयोग गुरूत्वीय लहरी संदेशांचे मापन करण्यासाठी होतो. अवकाशातील इव्हॉल्व्हड लेसर इंटरफेकोमीटर स्पेस अँटेना (एलिसा) डिटेक्टरच्या माध्यमातून २०३४ पर्यंत महाकृष्णविवरांच्या टकरीनंतरच्या गुरूत्वीय लहरींची किमान दोन निरीक्षणे शक्य आहेत. फेब्रुवारीत लायगो व व्हिर्गो यांच्या आंतरराष्ट्रीय सहकार्याने प्रथम गुरूत्वीय लहरी शोधण्यात आल्या होत्या, त्यानंतरही दुसऱ्यांदा गुरूत्वीय लहरींची निरीक्षणे नोंदवली गेली होती. एलिसा हे उपकरण अवकाशात पाठवले जाणार असून ते पृथ्वीवरील उपकरणांपेक्षा अडीच लाख पट मोठे असणार आहे. कमी कंप्रतेच्या गुरूत्वीय लहरी यात शोधता येतील. आताच्या सिद्धांतानुसार कृष्णविवरांची बीजे ही विश्वातील पहिल्या पिढीतील ताऱ्यांचा जन्म व मृत्यू याच्याशी निगडित आहेत. अति वस्तुमानाच्या ताऱ्याच्या कोसळण्यातून विश्वात फार आधी अशी कृष्णविवरे तयार झाली असावीत. डय़ुरहॅम विद्यापीठाच्या इन्स्टिटय़ूट फॉर कॉम्प्युटेशनल कॉस्मॉलॉजी या संस्थेचे जेमी सालसिडो यांनी सांगितले, की २ गुरूत्वीय लहरींचे आणखी आकलन झाल्यास विश्वाची माहिती मिळेल.

गुरूत्वीय लहरींचे सादृश्यीकरण करून कृष्णविवरांची बीजे शोधण्यात येत आहेत. गुरूत्वीय लहरी आहेत असे भाकीत अल्बर्ट आइनस्टाईनने त्याच्या सामान्य सापेक्षतावादाच्या सिद्धांतात केले होते. विश्वातील स्फोटक घटनांमधून सुटणाऱ्या

ऊर्जेचे हे तरंग असतात व त्यामुळे अवकाश व काळ यांच्यावर परिणाम होतो, पण बहुतेक गुरूत्वीय लहरी इतक्या क्षीण असतात की त्या शोधता येत नाहीत.