10 July 2020

News Flash

योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर प्रकरणी व्यापाऱ्याला अटक

या व्यापाऱ्याचे नाव चांद कुरेशी असे असून तो जेवार शहरातील रहिवासी आहे.

| February 21, 2020 01:57 am

योगी आदित्यनाथ

नोइडा (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दलची आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट शेअर केल्याबद्दल ग्रेटर नोइडातील एका व्यापाऱ्याला अटक करण्यात आल्याचे गुरुवारी पोलिसांनी सांगितले. या व्यापाऱ्याचे नाव चांद कुरेशी असे असून तो जेवार शहरातील रहिवासी आहे. बुधवारी सायंकाळी त्याला अटक करण्यात आली. ही फेसबुक पोस्ट आपण चुकून शेअर केल्याचे कुरेशी याने म्हटले आहे. योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट शेअर केल्यानंतर त्याबाबत स्थानिक रहिवाशाने तक्रार नोंदविली. त्यानंतर कुरेशी याला अटक करण्यात आली. योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात समाज माध्यमांवर आक्षेपार्ह शेरेबाजी केल्याबद्दल उत्तर प्रदेशच्या गोरखपूर जिल्ह्य़ातील दोघा जणांना जून २०१९ मध्ये अटक करण्यात आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2020 1:57 am

Web Title: greater noida businessman arrested for offensive fb post on yogi adityanath
Next Stories
1 दिल्ली सामूहिक बलात्कार-खून प्रकरण : आरोपी विनयकुमारची वैद्यकीय उपचारांसाठी याचिका
2 लष्कराच्या विमानाने वुहानमधील १०० भारतीयांना मायदेशात आणणार
3 तमिळनाडूत केरळ परिवहन महामंडळाची बस-ट्रक धडक, २० ठार
Just Now!
X