26 September 2020

News Flash

ग्रीसवर आर्थिक संकटाची टांगती तलवार कायम

ग्रीस आता दिवाळखोरीच्या उंबरठय़ावर असतानाच आंतरराष्ट्रीय कर्जदारांनी आपत्कालीन बैठकीत या पेचावर तोडगा काढण्याच्या शक्यतेवर पाणी ओतले आहे.

| June 23, 2015 12:30 pm

ग्रीस आता दिवाळखोरीच्या उंबरठय़ावर असतानाच आंतरराष्ट्रीय कर्जदारांनी आपत्कालीन बैठकीत या पेचावर तोडगा काढण्याच्या शक्यतेवर पाणी ओतले आहे. ग्रीसला दिवाळखोरीतून बाहेर काढणे व त्या देशाची युरोपीय समुदायातून हकालपट्टी टाळण्यासाठी कर्जदारांनी काही सवलती देणे अपेक्षित होते, पण तसे काही घडले नाही.
मोठा कर्जदार असलेल्या जर्मनीने म्हटले आहे की, ग्रीसचे पंतप्रधान अलेक्सिस टिसप्रास यांनी अखेरच्या क्षणी सुधारणांचे जे प्रस्ताव मांडले आहेत ते पुरेसे नाहीत. तर, फ्रान्सच्या मते काही दिवसात ग्रीसच्या प्रश्नावर तोडगा निघेल. ब्रुसेल्स येथे युरोझोन मंत्र्यांची बैठक होत असतानाच त्यात पाच महिन्यांच्या या प्रश्नावर काही तोडगा निघण्याची शक्यता मावळली आहे. जर्मनीचे अर्थमंत्री वुल्फगँग शॉबल यांनी सांगितले की, नव्या प्रस्तावांची आपल्याला माहिती नाही, अजूनतरी पुरेसे प्रस्ताव आमच्याकडे आलेले नाहीत. टिसप्रास यांनी, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे १.५ अब्ज युरोचे देणे परत करण्याबाबत अखेरच्या क्षणी काही प्रस्ताव मांडले. ३० जूनपर्यंत हे पैसे देणे आवश्यक आहे. युरोपीय समुदायातून ग्रीस बाहेर फेकला जाण्याची शक्यता आहे. ग्रीसला ७.२ अब्ज युरोचे पॅकेज देण्यासाठी कर्जदारांनी काटकसरीची अट घातली होती. ग्रीसने गोंधळात टाकणारे प्रस्ताव सादर केल्याने सोमवारी ग्रीसची पेचप्रसंगातून सुटका होऊ शकली नाही, असे युरोग्रुपचे प्रमुख जेरोन डिसेलब्लोम यांनी सांगितले. टिसप्रास यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या ख्रिस्तीन लॅगार्ड यांच्याशी चर्चा केली, पण लॅगार्ड यांनी कठोर भूमिका घेतली आहे. अर्थसंकल्पी तरतुदी, पेन्शन कमी करणे व विजेवर व्हॅट वाढवण्यास टिसप्रास यांनी तयारी दर्शवली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2015 12:30 pm

Web Title: greece offers new debt plan
Next Stories
1 ‘सीआयएसएफ’च्या नऊ जवानांना कोठडी
2 अन्सारींच्या गैरहजेरीच्या वादात केंद्राची दिलगिरी
3 परदेशातील काळा पैसा जाहीर करण्यासाठी मुदतवाढ ?
Just Now!
X