काश्मीरसंदर्भात दिवसोंदिवस पाकिस्तान आणि टर्की या दोन देशांचे संबंध अधिक दृढ होताना दिसत आहे. असं असतानाच या दोन्ही देशांच्या दरम्यान काश्मीरसंदर्भात एक योजना आखली जात असल्याचा दावा ग्रीसमधील काही प्रसारमाध्यमांनी केला आहे. पाकिस्तानला काश्मीर विषयावर मदत करण्यासाठी टर्कीचे राष्ट्राध्यक्ष रिसीप तयिप एर्दोगन यांनी दहशतवाद्यांची एक तुकडी पाठवण्याची तयारी सुरु केल्याचे वृत्त आहे. काश्मीरमध्ये अशांतता निर्माण करण्यासाठी दृष्टीने ही तुकडी पाकिस्तानच्या मदतीसाठी टर्कीकडून पाठवली जाण्याची शक्यता आहे. एर्दोगन यांच्या लष्करी अधिकाऱ्याने यासाठी मदत व्हावी म्हणून अमेरिकेत काश्मीर संदर्भात काम करणाऱ्या एक दहशतवादी संघटनेच्या प्रमुखाशी चर्चा केल्याचे वृत्त आहे.

ग्रीसमधील पेंटापोस्टाग्मा नावाच्या वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, टक्की पाकिस्तानच्या मदतीसाठी लष्करी संघटनेच्या जवानांची म्हणजेच सादातची एक तुकडी काश्मीरमध्ये पाठवण्याच्या तयारीत आहे. टर्की मध्ये आशियामध्ये स्वत:ला अधिक सामर्थ्यवान बनवण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळेच आता टर्कीने पाकिस्तानच्या मदतीने काश्मीरमध्ये अशांतता पसरवण्याचा विचार सुरु केलाय. या अहवालामध्ये टक्कीचे राष्ट्राध्यक्ष रिसीप तयिप एर्दोगन यांनी  या मोहिमेची जबाबदारी सादात या लष्करी तुकडीकडे दिली आहे. सादातच्या नेतृत्व एर्दोगन यांच्याकडे असलं तरी त्यांचा प्रमुख सल्लागार अदनाना तनरिवर्दी हे सारं काम पाहतो. तनरिवर्दी याने काश्मीरमध्ये सादातचा तळ निर्माण करण्यासाठी काश्मीरमध्ये जन्मलेल्या सय्यद गुलाम नबी फई नावाच्या दहशतवाद्याची नियुक्ती केली आहे. फई पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा असणाऱ्या आयएसआय़च्या पैशांच्या मदतीने भारताविरोधात तरुणांची माथी भडकवून त्यांना लष्करामध्ये भरती करण्यासाठी आणि टॅक्स चोरीच्या प्रकरणांमध्ये अमेरिकेत दोन वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा भोगून सुटला आहे.

आणखी वाचा- Shame on you China : म्यानमारमधील सत्तांतरणाविरोधात चिनी दूतावासासमोर नागरिकांचे आंदोलन

सय्यद गुलाम नबी फईचा जन्म जम्मू काश्मीरमधील बडगाम येथे एप्रिल १९४९ साली झाला. फईहा कट्टरतावादी संघटना असणाऱ्या जमात ए इस्लामीचा सक्रीय सदस्य आहे. अमेरिकेत असताना फईने काश्मीरविरोधात कट रचण्यासाठी अमेरिकन काउन्सिल ऑफ काश्मीरची स्थापना केली. या संस्थेला निधी पुरवण्याचं काम पाकिस्तानच्या आयएसआयकडून केलं जातं. यासंदर्भातील खुलासा अमेरिकन गुप्तचर यंत्रणा असणाऱ्या एफबीआयनेच केलं आहे. ही संघटना टक्कीमधील सादात आणि इस्लामिक देशांना एकत्र आणण्याच्या नावाखाली चालवण्यात येणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून काश्मीरमध्ये अशांतता पसरवण्याचे कट रचते. काश्मीरसंदर्भात फई आजही सक्रीय असल्याचा इशारा या अहवालात देण्यात आलाय. सादातच्या अनेक कार्यक्रमांना फईची हजेरी असते. फईे एर्दोगन यांचा खास माणूस असणाऱ्या तनरिवर्दीचीही भेट घेतल्याचे वृत्त आहे. हे दोघे मिळून काश्मीरमध्ये मोठा कट रचण्याच्या तयारीत असल्याचे अहवालात म्हटलं आहे.