X

ग्रीन पीस इंडिया संस्थेत लैंगिक अत्याचार

ग्रीन पीस या स्वयंसेवी संस्थेची खाती सरकारने गोठवल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता या संस्थेत काम करणाऱ्या एका माजी महिला कर्मचाऱ्याने

ग्रीन पीस या स्वयंसेवी संस्थेची खाती सरकारने गोठवल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता या संस्थेत काम करणाऱ्या एका माजी महिला कर्मचाऱ्याने आपल्यावर पुरुष सहकाऱ्यांनी बलात्कार करून छळवणूक केल्याचा आरोप केला आहे. ग्रीन पीसने आता या प्रकरणी संबंधितांवर कारवाई केली नाही तर अशी आणखी काही प्रकरणे बाहेर येण्याची शक्यता आहे.

वेब फोरम वर लिहिलेल्या लेखात एका माजी महिला कर्मचाऱ्याने (नाव दिलेले नाही) म्हटले आहे, की २०१३ मध्ये आपल्याला सहकाऱ्यांनी केलेला बलात्कार व लैंगिक छळवणूक यामुळे ग्रीनपीसमधील नोकरी सोडावी लागली. ग्रीनपीसच्या बंगळुरू केंद्रात काम सुरू केल्यानंतर ऑक्टोबर २०१३ रोजी घडलेल्या घटनेत एका वरिष्ठ सहकाऱ्याने रात्री आपल्याला खोली सोडायला लावली व त्याच्या खोलीत येऊन झोपण्याचा आग्रह धरला. आणखी एके दिवशी एका सहकाऱ्याने वाढदिवसाचा केक बळजबरीने तोंडात कोंबण्याचा प्रयत्न केला. मनुष्यबळ व्यवस्थापकांकडे तक्रार करूनही काही उपयोग झाला नाही, सदर इसम हा गुन्हेगार होता व त्याच्यावर महिला कर्मचाऱ्यांशी गैरवर्तणूक करूनही काहीच कारवाई झाली नाही. एकदा कार्यालयीन बैठकीत दोन वरिष्ठ कर्मचाऱ्यांनी आपले चारित्र्यहनन केले व काही महिला कर्मचाऱ्यांनी त्यांची बाजू घेत ‘आपलीच चूक असून तू तुझ्या मर्यादा घालून घे’ असा सल्ला दिला. २०१३ मध्ये एका पार्टीच्या वेळी एका पुरुष सहकाऱ्याने बेशुद्ध पडल्याचे पाहून आपल्यावर बलात्कार केला, बलात्काराची घटना सांगण्याचे धैर्य नव्हते आपण घाबरलेलो होतो, संस्थेतील कुणीही पाठीशी नव्हते, त्यामुळे आपण नोकरीच सोडून दिली. ही घटना फेसबुकवर फेब्रुवारीत लिहिल्यानंतर ग्रीन पीसने माफी मागितली व या घटनेची फेरचौकशी करण्याचे आश्वासन दिले,

रिमा गांगुली या दुसऱ्या एका महिला कर्मचाऱ्याने म्हटले आहे, की एका अधिकाऱ्याने विनयंभग करणाऱ्या व्यक्तीस काढून टाकण्यास समितीच्या शिफारशीनंतरही नकार दिला होता. ग्रीन पीस इंडियाच्या प्रकल्प संचालक दिव्या रघुनंदन यांनी सांगितले, की माजी कर्मचाऱ्यांनी उपस्थित केलेले काही मुद्दे खरे आहेत. त्याची गांभीर्याने चौकशी केली जाईल. आधीच्या व्यवस्थेत काही उणिवा होत्या. आता अधिक चांगल्या प्रकारे ही प्रकरणे हाताळली जातील. मार्च २०१५ मध्ये एका महिला कर्मचाऱ्याविरोधात पहिल्याच प्रकरणातील संबंधित व्यक्तीने आक्षेपार्ह टिप्पणी केली, त्यावर या महिलेने मनुष्यबळ व्यवस्थापकांकडे तक्रार करूनही काही झाले नाही. त्यामुळे या महिलेवर नोकरी सोडण्याची वेळ आली.

माजी कर्मचारी उषा सक्सेना यांनी म्हटले आहे, की आपण ग्रीन पीसमध्ये असताना अशा प्रकरणांवर आवाज उठवला पण त्याचा काही उपयोग झाला नाही.

  • Tags: greenpeace-india, sexual-assault,
  • Outbrain