रमजानच्या महिन्यातसुद्धा दहशतवादी शांत बसण्याचे नाव घेत नाही आहे. गुरुवारी उशीरा रात्री दहशतवाद्यांनी जम्मू येथील बस स्थानकावर ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी थेट पोलीसांवर निशाणा साधला आहे. या ग्रेनेड हल्लात २ पोलिस कर्मचारी तर १ नागरीक जखमी झाल्याचे एएनआय म्हटले आहे.

या हल्ल्यामळे परिसरात तणावाच वातावरण निर्माण झाला आहे. सुरक्षा दलांनी हल्ल्याचा संपूर्ण भाग सील केला असून दहशतवाद्यांचा शाध सुरू आहे. सुंजवा लष्करी  तळावरील हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा जम्मूमध्ये हल्ला केला आहे.