News Flash

काश्मीरमध्ये ग्रेनेड हल्ला; दोन जवानांसह चार जण जखमी

जखमींमध्ये दोन नागरिकांचा समावेश

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा सुरक्षा दलाच्या जवानांना निशाणा बनवले. श्रीनगरमधील लाल चौकात सुरक्षा जवानांवर ग्रेनेड दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. यात दोन जवान आणि दोन नागरिकांसह चौघे जखमी झाले आहेत. काश्मीर पोलिसांनी या घटनेची माहिती दिली.

काश्मीर विभागीय पोलिसांच्या माहितीनुसार श्रीनगरमधील प्रताप पार्क जवळील लाल चौकात सीआरपीएफची तुकडी तैनात करण्यात आली होती. गस्तीवर असतानाच या तुकडीवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. यात दोन जवान आणि नागरिक जखमी झाले आहेत. जखमी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

जम्मू काश्मीरमध्ये अशांतता निर्माण करण्यासाठी सीमेपलिकडून वारंवार घुसखोरी केली जाते. विशेषतः दहशतवाद्यांकडून वारंवार सुरक्षा जवानांना लक्ष्य करण्यात येते. जम्मू काश्मीरमधून ३७० कलम हटवल्यापासून असे प्रयत्न झाले. मात्र, लष्कारानं हे प्रयत्न हाणून पाडले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2020 1:38 pm

Web Title: grenade attack on crpf personnel in jammu kashmir bmh 90
Next Stories
1 खळबळजनक : विश्व हिंदू महासभेच्या अध्यक्षांची गोळ्या घालून हत्या
2 Budget 2020 : स्थावर मालमत्ता, वाहन उद्योगाकडे दुर्लक्ष
3 Budget 2020 : दिलासा नव्हे कटकटी
Just Now!
X