News Flash

उच्च सुरक्षा असलेल्या लाल चौकमध्ये ग्रेनेड हल्ला, दुकाने, गाडीचे नुकसान

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी शुक्रवारी सुरक्षा पथकांवर दोन ग्रेनेड हल्ले केले. यात एक हल्ला लाल चौकमध्ये करण्यात आला.

संग्रहित छायाचित्र

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी शुक्रवारी सुरक्षा पथकांवर दोन ग्रेनेड हल्ले केले. यात एक हल्ला लाल चौकमध्ये करण्यात आला. लाल चौकमधील सीआरपीएफच्या बंकरवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकले. या ग्रेनेडचा रस्त्यावर स्फोट झाला. त्यात कोणीही जखमी झाले नाही. स्फोटामध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या एका खासगी गाडीचे थोडे नुकसान झाले असे अधिकाऱ्याने सांगितले.

दुसरा ग्रेनेड हल्ला श्रीनगरमध्ये करण्यात आला. श्रीनगरमधल्या झीरो ब्रीजवर तैनात असलेल्या पोलिसांच्या दिशेने ग्रेनेड फेकण्यात आले. यात तीन पोलीस जखमी झाले अशी माहिती पीटीआयने दिली.

दक्षिण काश्मीरमधील शोपियन जिल्ह्यात सुरक्षा पथकांवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकले. यात कोणीही जखमी झाले नाही पण काही प्रमाणात संपत्तीचे नुकसान झाले. प्रजासत्ताक दिनाला दहापेक्षा कमी दिवस उरलेले असताना हे ग्रेनेड हल्ले झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2019 3:22 pm

Web Title: grenade attacks in kashmir
Next Stories
1 आर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाला द्रमुकचे मद्रास हायकोर्टात आव्हान
2 एसी खोल्यांमध्ये बसून राम मंदिरावर राजकारण सुरु : प्रकाश राज
3 शबरीमला मंदिरात प्रवेश करणाऱ्या महिलांना सुरक्षा द्या – सर्वोच्च न्याायलय
Just Now!
X