03 March 2021

News Flash

… बोल कि सच जिंदा है अब तक; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

काही घटना केल्या ट्विट

पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेसचे नेते राहुल गाांधी. (संग्रहित छायाचित्र)

शेतकरी आंदोलनासह वेगवेगळ्या मुद्द्यांवरून मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा धारेवर धरलं आहे. पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवी हिला अटक करण्यात आल्यानंतर दिल्लीतील राजकारण तापलं आहे. काँग्रेससह विरोधी पक्षानी भाजपाला लक्ष्य केलं असून, राहुल गांधी यांनीही काही घटनांचा दाखल देत सरकारवर हल्लाबोल केला आहे.

दिशा रवीला अटक केल्यानंतर राहुल गांधी यांनी सरकारवर निशाणा साधत गळचेपी केला जात असल्याचं आरोप केला आहे. राहुल गांधी यांनी काही घटनांच्या बातम्या ट्विट केल्या आहे. यात ग्रेटा थनबर्ग टूलकिट प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दिशाच्या बातमीसह पत्रकाराला देण्यात आलेली धमकी व ट्विटरच्या कर्मचाऱ्यांना धमकावल्याची बातमीही ट्विट केली आहे.

आणखी वाचा- ‘ग्रेटा टूलकिट’ प्रकरण : न्यायालयात बोलताना दिशाचे डोळे आले भरून; म्हणाली…

या तीन बातम्या ट्विट करत राहुल गांधी यांनी फैज अहमद फैज यांच्या कवितेतील ‘बोल कि लब आज़ाद हैं तेरे, बोल कि सच ज़िंदा है अब तक!’ओळी पोस्ट केल्या आहेत. त्याचबरोबर “ते (मोदी सरकार) घाबरले आहेत, पण देश घाबरलेला नाही. भारत गप्प बसणार नाही,” असा इशारा राहुल गांधी यांनी मोदी सरकारला दिला आहे.

आणखी वाचा- “भारत मूर्खपणाची रंगभूमी ठरतोय, जर २२ वर्षांची विद्यार्थिनी देशासाठी धोका ठरत असेल तर…”

प्रियंका गांधीनींही डागलं टीकास्त्र

दिशा रवी या कार्यकर्तीच्या अटकेवरून काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनीही मोदी सरकारवर टीकास्त्र डागलं आहे. बंदूक असणारे एका निशस्त्र मुलीला घाबरले आहेत, अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली आहे. “डरते हैं बंदूकों वाले एक निहत्थी लड़की से… फैले हैं हिम्मत के उजाले एक निहत्थी लड़की से,’ अशा शब्दात प्रियंका गाधी यांनी निशाणा साधला आहे.

आणखी वाचा- “कार्यकर्त्यांना जेल आणि दहशतवाद्यांना बेल”, दिशा रवीच्या अटकेवरुन शशी थरुर यांनी साधला निशाणा

शेतकरी आंदोलनासंदर्भात टूलकिट तयार करण्यात आल्याचं दिल्ली पोलिसांनी म्हटलं होतं. त्यानंतर रविवारी (१४ फेब्रुवारी) पोलिसांनी दिशा रवी या तरुणीला या प्रकरणात अटक केली. तिच्या अटकेवरून देशातील राजकीय वातावरण तापलं आहे. पोलिसांच्या या कारवाईवरून विरोधकांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2021 11:40 am

Web Title: greta thunberg farm protest toolkit disha ravi arrests rahul gandhi tweet on modi govt bmh 90
Next Stories
1 जगातील सर्वात प्राचीन बिअर फॅक्टरी; पाच हजार वर्षापूर्वीचं रहस्य उघड
2 “कार्यकर्त्यांना जेल आणि दहशतवाद्यांना बेल”, दिशा रवीच्या अटकेवरुन शशी थरुर यांनी साधला निशाणा
3 ‘ग्रेटा टूलकिट’ प्रकरण : न्यायालयात बोलताना दिशाचे डोळे आले भरून; म्हणाली…
Just Now!
X