27 February 2021

News Flash

‘ग्रेटा टूलकिट’ प्रकरण : न्यायालयात बोलताना दिशाचे डोळे आले भरून; म्हणाली…

‘फ्रायडेज फॉर फ्यूचर इंडिया’ संघटनेची संस्थापक असलेल्या दिशावर टूलकिटमध्ये बदल केल्याचा आहे आरोप

दिशा रवीला रविवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं. न्यायालयाने तिला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. (छायाचित्र/इंडियन एक्स्प्रेस)

पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने शेतकऱ्यांबद्दल ट्विट केलेल्या टूलकिट प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली. बंगळुरुतील दिशा रवी या २२ वर्षीय पर्यावरण कार्यकर्तीला दिल्ली पोलिसांनी शनिवारी अटक केली. तिच्यावर टूलकिटमध्ये बदल केल्याचा आणि पुढे पाठवल्याचा आरोप आहे. दरम्यान, दिशाला पोलिसांनी न्यायालयात हजर केलं. न्यायालयात बोलताना दिशाचे डोळे भरून आले.

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देताना स्वीडिश पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग कथित ‘टूलकिट’ ट्विट केलं होतं. या टूलकिट प्रकरणी दिल्ली पोलिसांनी ४ फेब्रुवारी रोजी गुन्हाही दाखल केला होता. गुन्हा दाखल केल्याच्या दहा दिवसानंतर पोलिसांनी बंगळुरूतील दिशा रवी या पर्यावरण कार्यकर्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. त्यानंतर अटक केली.

आणखी वाचा- “भारत मूर्खपणाची रंगभूमी ठरतोय, जर २२ वर्षांची विद्यार्थिनी देशासाठी धोका ठरत असेल तर…”

अटक करण्यात आल्यानंतर दिल्ली पोलिसांनी दिशाला दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयासमोर हजर केलं. न्यायाधीश देव सरोहा यांच्यासमोर या प्रकरणी सुनावणी झाली. सुनावणीवेळी न्यायालयात बोलताना दिशाचे डोळे भरून आले. ती म्हणाली,”आपण कोणत्याही कटात वा गटामध्ये सहभागी नाही. मी फक्त शेतकऱ्यांना पाठिंबा देत आहे… कारण ते आपलं भविष्य आहेत. आपल्या अन्नाची गरज आहे आणि शेतकरीच आहेत जे आपल्याला अन्न पुरवतात. आपण कोणतीही टूलकिट तयार केली नव्हती. त्या कागदपत्रामध्ये आपण फक्त दोन बदल केले होते,” असं दिशाने न्यायालयाला सांगितलं.

आणखी वाचा- “कार्यकर्त्यांना जेल आणि दहशतवाद्यांना बेल”, दिशा रवीच्या अटकेवरुन शशी थरुर यांनी साधला निशाणा

शेतकरी आंदोलनासंदर्भात ‘टूलकिट गूगल डॉक्युमेंट’ तयार करण्यात आणि ते प्रसारित करण्यात तिचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर दिशाला अटक करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने रविवारी सांगितले. दिशा रवी हिला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली. दिशा बेंगळूरुमध्ये राहत होती. तिने एका खासगी महाविद्यालयातून ‘उद्योग प्रशासन’ या विषयात पदवी संपादन केली आहे. ‘फ्रायडेज फॉर फ्यूचर इंडिया’ या संघटनेची ती संस्थापक सदस्य असून, पर्यावरणवादी कार्यकर्ती आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2021 9:39 am

Web Title: greta thunberg farm protest toolkit ravi broke down during the hearing bmh 90
Next Stories
1 बिहार : सुशांत सिंह राजपूतच्या भावावर गोळीबार करणारे अटकेत
2 “भारत मूर्खपणाची रंगभूमी ठरतोय, जर २२ वर्षांची विद्यार्थिनी देशासाठी धोका ठरत असेल तर…”
3 ‘व्हॅलेंटाईन डे’ला तोडफोड : भाजपाच्या माजी आमदारासह १७ जणांना अटक
Just Now!
X