News Flash

मोठी कारवाई! ग्रेटा ‘टूलकिट’ प्रकरणी पर्यावरणवादी कार्यकर्ता दिशाला अटक

दिल्ली पोलिसांची बंगळुरूत कारवाई

संग्रहित छायाचित्र

पर्यावरणवादी कार्यकर्ता ग्रेटा थनबर्ग ट्विट केलेल्या टूलकिट प्रकरणी दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी एका २१ वर्षाय पर्यावरण कार्यकर्ता आणि विद्यार्थी असलेल्या दिशा रवि या तरुणीला अटक केलं आहे. तिच्या बंगळुरूतील घरातून पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं असून, शेतकरी आंदोलनासंदर्भात असलेल्या टूलकिटमध्ये बदल केल्याचा तिच्यावर आरोप आहे. याप्रकरणी ४ फेब्रुवारी रोजी दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू आहे. सरकारचं मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलक शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅली काढली होती. या रॅलीनंतर दिल्लीत हिंसाचार झाला. त्यानंतर सरकारनं शेतकऱ्यांना दिल्लीत येण्यापासून रोखण्याबरोबरच इंटरनेट सेवाही बंद केली होती. याप्रकरणी पॉपस्टार सिंगर रिहानाबरोबर पर्यावरण कार्यकर्ता असलेल्या ग्रेटा थनबर्गने ट्विट करत शेतकऱ्यांना पाठिंबा दिला होता. त्याचबरोबर ग्रेटाने एक टूलकिट ट्विट केली होती. जी नंतर डिलीट करण्यात आली.

टूलकिटसमोर आल्यानंतर दिल्ली पोलिसांनी ४ फेब्रुवारी रोजी गुन्हा नोंदवला होता. याच प्रकरणात पोलिसांनी दिशा रवि या तरुणीला ताब्यात घेतलं आहे. बंगळुरूतील सोलदेवानापल्ली परिसरात ती वास्तव्याला असून, तिथेच पोलिसांनी तिला अटक केलं. दिशावर शेतकऱ्यांशी संबंधित असलेल्या टूलकिटमध्ये बदल करून आणखी मुद्दे समाविष्ट केल्याचा आणि ती पुढे पाठवल्याचा आरोप आहे.

ग्रेटा थनबर्गने हवामान बदलाच्या मुद्द्यावरून शाळेत संप केल्यानंतर २०१८ पासून जागतिक पातळीवर हवामान बदलांविरुद्ध चळवळ उभी राहिली आहे. दिशा हवामान बदलांशी संबधित फ्रायडे फॉर फ्यूचर या अभियानाची संस्थापक सदस्य आहे. पोलिसांनी दिशाची चौकशी केली. आपण टूलकिटमध्ये बदल करून पुढे पाठवल्याची कबूली तिने दिली असल्याचं दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2021 11:08 am

Web Title: greta thunberg toolkit case climate activist 21 picked up from bengaluru bmh 90
Next Stories
1 बस-ट्रकचा भीषण अपघात; १३ जण जागीच ठार, चौघांवर उपचार सुरू
2 सामूहिक प्रयत्नांद्वारे ‘साथ’मुक्तीकडे…
3 संपूर्ण कृषी उद्योग ‘दोन मित्रां’च्या सुपूर्द करण्याची मोदी यांची इच्छा- राहुल
Just Now!
X