News Flash

वरात घेऊन नवरदेव पोहोचला दारात पण नवरीचे दुसऱ्याबरोबर लागले लग्न

घ्या... बॅण्ड आणि फोटोग्राफर न आणल्याने मोडल लग्न

(संग्रहित छायाचित्र)

कशामुळे काय बिघडेल याचा नेम नाही. अशीच एक विचित्र घटना उत्तर प्रदेशमधील जहागीराबाद तालुक्यात घडली आहे. बॅण्ड आणि फोटोग्राफरशिवाय वरात घेऊन गेलेल्या नवरदेवाला नवरीने तसेच परत पाठवले. इतकेच नाही, तर ऐनवेळी दुसऱ्या मुलाशी संसारही थाटला.

जहागीराबाद तालुक्यातील एका गावातील मुलीचे गौतमबुद्धनगर जिल्ह्यातील एका गावातील मुलाशी लग्न होते. रविवारी रात्री ११ वाजता नवरदेव वरातीसह आला. पण, एक गोष्ट सगळ्यानाच खटकली. वरातीसोबत ना बॅण्ड होता ना फोटोग्राफर. त्यात नवरीसाठी आणलेले सामानही कमी निघाले. मग नवरीकडच्या मंडळीमध्ये चर्चा सुरू झाली.

त्यानंतर वधु वराकडील मंडळींची बैठक बोलावली गेली. पण, तोडगा काही निघाला नाही. नवरीची जबाबदारी घेण्याबद्दल पंचानी विचारलेल्या प्रश्नालाही नवरदेवाने उडवाउडवीचे उत्तर दिली त्यामुळे लग्न फिस्कटलं. गावकऱ्यांनी घडलेलल्या सर्व प्रकरणाची माहिती पोलिसांनाही दिली.  घरच्यांच्या संमतीने मुलीने जवळच्या गावातील दुसऱ्या मुलाला वरमाला घालत संसाराला सुरूवात केली. तर वरात घेऊन आलेला नवरदेव मात्र आला तसाच परत गेला.

जहांगीराबाद पोलीस स्थानकातील निरीक्षक नरेश कुमार शर्मा यांनी सांगिले की, रविवारी रात्री उशीरा एखा गावांत लग्नाची वरात आली होती.  मात्र, वरातीमध्ये बँड बाजा आणि फोटोग्राफर नसल्यामुळे दोन्ही कुटुंबात वाद झाला. अखेरीस हे प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये आले होते. येथे दोन्ही कुटुंबाची समजूत काढून पाठवले. मुलीने जवळच्या गावातील एका मुलांसोबत लग्न केले तर लग्नासाठी वरात घेऊन आलेला नवरदेव रिकाम्या हाताने माघारी गेला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2019 1:19 pm

Web Title: groom come with wedding procession but bride goes with another man nck 90
Next Stories
1 आईला वाचवण्यासाठी भांडणात पडणाऱ्या सात वर्षाच्या मुलीची बापाकडून हत्या
2 विलासरावांचे सरकार तारणारे शिवकुमार कर्नाटकचे सरकार वाचवणार का?
3 भाजपा आमदाराचा हातात दारु आणि बंदुका घेऊन डान्स, व्हिडीओ व्हायरल
Just Now!
X