News Flash

लग्नाच्या जल्लोषात हवेत गोळीबार, नवरदेवाच्या वडिलांचा मृत्यू

लग्न सोहळयांमध्ये हवेत गोळीबार करुन आनंद व्यक्त केला जातो.

उत्तर भारतात काही लग्न सोहळयांमध्ये हवेत गोळीबार करुन आनंद व्यक्त केला जातो. सेलिब्रेशनसाठी केल्या जाणाऱ्या या गोळीबारामध्ये काही वेळा निष्पाप व्यक्तीचा मृत्यू सु्द्धा होतो. उत्तर भारतात अशा अनेक घटना घडल्या आहेत. आता मध्य प्रदेशात उज्जैनमध्ये लग्नसोहळयात सेलिब्रेशन म्हणून केलेल्या गोळीबारात नवरदेवाच्याच वडिलांचा मृत्यू झाला.

उज्जैनपासून ३० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या जागोती गावात ही घटना घडली.  लग्नाची वरात मंदिराच्या दिशेने चालली असताना हा गोळीबार झाला. राघवी पोलीस स्टेशनचे प्रमुख शंकर सिंह चौहान यांनी ही माहिती दिली.

१२ बोअर बंदुकीतून झाडण्यात आलेली गोळी नवरदेवाचे वडिल विक्रम सिंह यांना जाऊन लागली. त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 14, 2019 6:29 pm

Web Title: groom father killed in celebratory firing madhya pradesh dmp 82
Next Stories
1 RFL Case: २३०० कोटींचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी रॅनबॅक्सीच्या माजी प्रवर्तकाला अटक
2 महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवटीचं नितीश कुमार यांच्याकडून समर्थन
3 इस्लामिक स्टेटने अफगाणिस्तानकडे वळवला मोर्चा, भारताला धोका
Just Now!
X