01 March 2021

News Flash

लग्नाचा बार उडवताना झालेल्या गोळीबारात नवरदेवच ठार

लग्नाच्या वरातीत दारू पिऊन नाचणाऱ्या वऱ्हाडी मंडळींनी गोळीबार सुरु केला. यातील एक गोळी नवरदेवाच्या छातीत लागली आणि त्याचा मृत्यू झाला

लग्नाच्या वरातीत दारू पिऊन गोळीबार करणे ही उत्तर प्रदेशातील फॅशनच आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मात्र ही गोळी बार करण्याची पद्धत नवरदेवाच्या जीवावर बेतली आहे. उत्तर प्रदेशातील खिरी जिल्ह्यात असलेल्या नीम गावात एक लग्न होते. या लग्नाच्या वरातीत दारू पिऊन नाचणाऱ्या वऱ्हाडी मंडळींनी गोळीबार सुरु केला. यातील एक गोळी नवरदेवाच्या छातीत लागली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

नीमगावाजवळच्या हाजीपूर या ठिकाणी वऱ्हाड आले होते. नवरदेवासोबत त्याचे मित्रही आले होते. नवरदेवाच्या मित्रांच्या नाच-गाण्यामुळे लग्नालाही उशीर झाला होता. रात्री एकच्या सुमारास जेव्हा वरात पुढे जात होती तेव्हा काही वऱ्हाडींनी गोळीबार केला. या गोळीबारात नवरदेवाच्या छातीला गोळी लागली त्यातच त्याचा मृत्यू झाला.

मुलीकडच्या नातेवाईकांनी नवरदेवाला उचलून लग्नाच्या ठिकाणी आणले, मात्र तिथेही या नवरदेवाच्या मित्रांनी गोंधळ घातला. मात्र हे सगळेजण नंतर पळून गेले.

लग्नाची धमाल सुरु होती, सगळे जण अत्यंत उत्साहात होते. मात्र या घटनेमुळे सगळ्याच कुटुंबावर शोककळा पसरली आहे. या आधीही गोळीबारात जखमी होण्याचे प्रकार घडले आहेत. मात्र गोळीबार करताना नवरदेवाचाच जीव गेल्याची ही बहुदा पहिलीच घटना आहे. लग्ना दरम्यान गोळीबार करणे बेकायदेशीर आहे. पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही या घटनेमुळे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

दुर्दैवाची बाब ही ठरली की लग्नाचे सगळे विधी पूर्ण झाले होते, त्यानंतर शेवटचा विधी बाकी होता. मात्र गोळीबार झाल्याने नवरदेवाचाच मृत्यू झाला. पोलीस आता पळून गेलेल्या वऱ्हाडींचा शोध घेत आहेत. या सगळ्यांविरोधात तक्रार करण्यात आली आहे असेही समजते आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2018 5:10 am

Web Title: groom killed during celebratory firing in ups lakhimpur kheri
Next Stories
1 एलईडी दिव्यांमुळे कर्करोगाच्या शक्यतेत वाढ
2 कर्नाटकी कौल : भाजपमुळे देशभरात भीतीचे वातावरण!
3 कर्नाटकी कौल : हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी
Just Now!
X