16 October 2019

News Flash

नोव्हेंबरमध्ये ९७,६३७ कोटी GST कर संकलन, ऑक्टोंबरच्या तुलनेत घसरण

ऑक्टोंबरच्या तुलनेत नोव्हेंबर महिन्यात वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलनात घसरण झाली आहे.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

ऑक्टोंबरच्या तुलनेत नोव्हेंबर महिन्यात वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलनात घसरण झाली आहे. मागच्या महिन्यातील १ लाख कोटींच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये ९७,६३७ कोटी जीएसटी जमा झाला आहे. ऑक्टोंबर महिन्यासाठी ३० नोव्हेंबर २०१८ पर्यंत एकूण ६९.६ लाख जीएसटीआर ३ बी रिर्टन्स फाईल झाले. अर्थ मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली.

ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यासाठी राज्यांना ११,९२२ कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली. ९७,६३७ कोटी रुपयांमध्ये केंद्रीय जीएसटी १६,८१२ कोटी रुपये आहे. राज्याचा जीएसटी २३,०७० कोटी रुपये आहे. ४९,७२६ कोटी रुपये आयजीएसटीमधून मिळाले आहेत. आयजीएसटीमध्ये २४,१३३ कोटी रुपये आयातीतून आणि ८,०३१ कोटी रुपये सेसमधून गोळा झाले आहेत.

एप्रिल महिन्यात जीएसटीमधून १.०३ लाख कोटी रुपये कर संकलन झाले होते. मे महिन्यात ९४,०१६ कोटी, जूनमध्ये ९५,६१० कोटी, जुलै मध्ये ९६,४८३ कोटी, ऑगस्टमध्ये ९३,९६० कोटी, सप्टेंबरमध्ये ९४,४४२ कोटी आणि ऑक्टोंबरमध्ये १,००,७१० कोटी रुपये करसंकलन झाले होते. त्यातुलनेत नोव्हेंबर महिन्यात करसंकलनात घसरण नोंदवण्यात आली आहे.

First Published on December 1, 2018 7:19 pm

Web Title: gst collection decline in november