आर्थिक वर्ष २०१९-२० च्या दुस-याच महिन्यात पुन्हा एकदा जीएसटी वसुलीने एक लाख कोटींचा आकडा पार केला आहे. अर्थ मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार मे मध्ये जीएसटी संकलन तब्बल १,००२८९ कोटी रूपये झाले. खरेतर एप्रिलच्या तुलनेत हे कमीच आहे.
Total Gross GST revenue collected in May, 2019 is Rs 1,00,289 crore of which CGST is Rs 17,811 crore, SGST is Rs 24,462 crore, IGST is Rs 49,891 crore (including ₹ 24,875 crore collected on imports) and Cess is Rs 8,125 crore (including Rs 953 crore collected on imports). pic.twitter.com/C57Gxj7ICH
— ANI (@ANI) June 1, 2019
मे महिन्यातील सीजीएसटी -१७,८११ कोटी रूपये, एसजीएसटी २४,४६२ कोटी रूपये व आयजीएसटीद्वारे ४९ हजार ८९१ कोटी रूपये वसूल झाले आहेत. यामध्ये आयातीद्वारे २४ हजार ८७५ कोटी रूपये व सेस मधुन ८ हजार १२५ कोटी रूपये वसूल झालेल्याचा देखील समावेश आहे.
एप्रिल महिन्यात १.१३ लाख कोटी रूपयांच्या वसूलीने विक्रम नोंदवला होता. त्याअगोदरच्या महिन्यातील जीएसटी वसूली १.०६ लाख कोटी रूपये झाली होती.
एप्रिल २०१८ च्या तुलनेत एप्रिल २०१९ मध्ये जीएसटी वसूली १०.०५ टक्क्यांनी वाढली. मागिल वर्षी एप्रिल महिन्यात जीएसटी वसूलीचा आकडा १ लाख ३ हजार ४५९ कोटी होता. सरकारने नियमित पुर्ततेच्या रूपात आयजीएसटीद्वारे २० हजार ३७० कोटी रूपयांचा सीजीएसटी व १५ हजार ९७५ कोटी रूपयांचा एसजीएसटीची पुर्तता केली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 1, 2019 6:26 pm