News Flash

सरकारी तिजोरीत एक लाख कोटी रुपयांचा GST जमा

कर्जाच्या दरांमध्ये कपात, कर चोरीवर लगाम आणणे यांसारख्या उपाययोजनांमुळे इतका चांगला महसूल सरकारला उपलब्ध होऊ शकल्याचे अरुण जेटलींनी म्हटले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

ऑक्टोबर महिन्यांत वस्तू व सेवा कराच्या माध्यमातून (जीएसटी) सरकारच्या तिजोरीत १ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल जमा झाला आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्वतः याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे. सरकारच्या अपेक्षेप्रमाणे हे उत्पन्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एप्रिल महिन्यानंतरच्या सहामाहीत जीएसटीची ही मिळकत पुन्हा एकदा १ लाख कोटींच्या पार गेली आहे. तर मे पासून ऑगस्टपर्यंत ही मिळकत ९० कोटींपेक्षा अधिक होती.


जेटली म्हणाले की, इतका चांगला महसूल मिळण्यामागील मोठे कारण म्हणजे कर्जाच्या दरांमध्ये कपात, कर चोरीवर लगाम आणणे होय. या सकारात्मक उपाय योजनांमुळे हे यश सरकारला मिळाले आहे. सरकारी तिजोरीतील ऑगस्टमधील जीएसटीची मिळकत ९३, ६९० कोटी रुपये होती.

या आठवड्यात सरकारला अर्थव्यवस्थेसंदर्भात दोन चांगल्या बातम्या मिळाल्या आहेत. पहिली म्हणजे उद्योग सुलभतेत भारताच्या क्रमवारीत ५० स्थानांनी सुधारणा होऊन भारत ७७ व्या क्रमांकावर पोहोचला. तर दुसरी बाब म्हणजे जीएसटीच्या महसुलात झालेली विक्रमी वाढ.
जागतिक बँकेच्या माहितीनुसार, मोदी सरकार २०१४ मध्ये सत्तेत आले त्यावेळी भारताचा उद्योग सुलभतेबाबत १४२वा क्रमांक होता. त्यानंतर पंतप्रधानांनी पुढील वर्षात भारताचे टॉपच्या ५० देशांच्या खास यादीत स्थान मिळवायचे लक्ष्य ठेवले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2018 4:47 pm

Web Title: gst collections for october 2018 have crossed rs 1 lakh crore
Next Stories
1 खूशखबर ! ४७ रेल्वेंमधील ‘फ्लेक्सी फेअर’ बंद
2 काँग्रेसच्या सोशल मीडिया प्रमुखाकडून पंतप्रधानांवर आक्षेपार्ह ट्विट
3 लग्नानंतर झाली HIVची लागण, पतीच्या मृत्यूनंतर सासरच्यांनीही हाकललं
Just Now!
X