News Flash

टीव्ही, संगणक आणि टायर यांच्यावरच्या जीएसटीत कपात

जीएसटी परिषदेची ३१ वी बैठक पार पडली. या बैठकीत महसूल या विषयावर मोठी चर्चा झाली अशीही माहिती जेटली यांनी दिली

अरुण जेटली

टीव्ही, संगणक, टायर, १०० रुपयांवरील सिनेमाची तिकिटे यांवरच्या जीएसटीत कपात करण्यात आली आहे. हा जीएसटी २८ टक्क्यांवरून १८ टक्के करण्यात आला आहे अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी केली. जीएसटी परिषदेची ३१ वी बैठक आज पार पडली त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.  जीएसटी परिषदेची ३१ वी बैठक पार पडली. या बैठकीत महसूल या विषयावर मोठी चर्चा झाली. दोन समित्यांनी त्यांची त्यांची मतं मांडली असेही जेटली यांनी म्हटले आहे.

 

२८ टक्के कर असलेल्या २८ च वस्तू त्या टॅक्स स्लॅबमध्ये उरल्या आहेत असेही अरूण जेटली यांनी स्पष्ट केले. सिमेंट आणि ऑटोमोबाइल सेक्टरमध्ये ही जीएसटीची कपात करण्यात आली आहे. ऑटोमोबाइल सेक्टरमधल्या १३ वस्तूंवरचा कर हा २८ टक्क्यांवरून १८ टक्के करण्यात आला आहे. तर सिमेंटवरचा करही २८ टक्क्यांवरून १८ टक्के करण्यात आला आहे असेही जेटली यांनी म्हटले आहे. ज्या वस्तूंवरचा कर २८ टक्क्यावरून १८ टक्के करण्यात आला त्या वस्तूंवर १ जानेवारी २०१९ पासून १८ टक्के जीएसटी आकारण्यात येईल असेही जेटली यांनी म्हटले आहे.

एकूण ३३ वस्तूंवरच्या जीएसटीत कपात करण्यात आल्याचे अरूण जेटली यांनी सांगितले आहे. २६ वस्तूंवरचा जीएसटी १२ ते ५ टक्के असा करण्यात आला आहे. तर बाकी सहा वस्तूंवरचा जीएसटी २८ वरून १८ टक्क्यांवर आणण्यात आला आहे.

२८ टक्क्यावरून १८ टक्क्यावर जीएसटी आलेल्या वस्तू
टायर
लिथियम बॅटरी
३२ इंचापर्यंतचा टीव्ही
१०० रुपयांवरचे सिनेमा तिकिट
बिलियर्ड्स आणि स्नूकर्स

जीएसटी १८ टक्क्यांपेक्षा कमी झालेल्या वस्तू
फूटवेअरवरचा जीएसटी १२ ते ५ टक्के असा करण्यात आला आहे
गोठवलेल्या भाज्या ५ टक्क्यांवरून ० टक्के
थर्ड पार्टी मोटर इन्शुरन्स १८ टक्क्यांवरून १२ टक्के
धार्मिक यात्रांवरचा जीएसटी १८ वरून १२ टक्के

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 22, 2018 4:25 pm

Web Title: gst council cuts tax on 40 items seven lowered from 28 to 18 slab
Next Stories
1 गोंधळ घातल्यास खासदाराचे दिवसभरासाठी निलंबन
2 राजीव गांधी भारतरत्न वाद: अलका लांबा म्हणतात राजीनामा देणार नाही
3 १९८४ शीखविरोधी दंगल: शिक्षेविरोधात सज्जन कुमारची सुप्रीम कोर्टात धाव
Just Now!
X