News Flash

सोन्यावर ३ टक्के कर, बिस्कीटे अन् कपड्यांवरील दरही निश्चित!

बिस्किटांवर १८ टक्के कर लागू करण्यात येणार

अरुण जेटली

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली आज, शनिवारी जीएसटी (वस्तू व सेवा कर) परिषदेची बैठक झाली. या बैठकीत जीएसटी विधेयकातील टप्प्यांनुसार सोन्यासह काही वस्तूंवरील कराचे दर निश्चित करण्यात आले. त्यात सोन्यावर तीन टक्के कर आकारला जाणार आहे. इतर वस्तूंचेही दर निश्चित करण्यात आले आहेत.

जीएसटी परिषदेची आज दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. सोन्यासह इतर वस्तूंवरील कराचे दर निश्चित करण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. बैठकीत वस्तूंवरील कर निश्चित करण्यात आले. सोने आणि सोन्याच्या दागिन्यांवर ३ टक्के कर आकारण्यात येणार आहे. रजिस्टर्ड ट्रेडमार्कनुसार विकण्यात येणाऱ्या वस्तूंवर ५ टक्के, तर १००० रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या कपड्यांवर ५ टक्के कर आकारला जाईल. सर्व प्रकारच्या बिस्किटांवर १८ टक्के कर लागू करण्यात येणार आहे. अर्थमंत्री जेटली यांनी ही माहिती दिली.

जीएसटी परिषदेने मागील महिन्यात १२०० वस्तू आणि ५०० सेवांवरील जीएसटी दर निश्चित केले होते. दरम्यान, आजच्या झालेल्या बैठकीत जीएसटी परिषदेने काही नियमांनाही मंजुरी दिली. तसेच १ जुलैपासून जीएसटी लागू करण्यास सर्व राज्यांनी सहमती दर्शवली आहे. विशेष म्हणजे, जीएसटी लागू झाल्यानंतर सेंट्रल एक्साईज ड्युटी, सर्व्हिस टॅक्स, अतिरिक्त कस्टम ड्युटी, स्पेशल अॅडिशनल ड्युटी ऑफ कस्टम, व्हॅट, मनोरंजन टॅक्स, जकात आणि टॅक्स ड्युटी यांसारखे विविध कर संपुष्टात येणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2017 9:06 pm

Web Title: gst finance minister arun jaitley announces tax rate
Next Stories
1 पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, राजौरी, पूंछ जिल्ह्यात गोळीबार
2 अफगाणिस्तानमध्ये सिनेटरच्या मुलाच्या अंत्यसंस्कारावेळी बॉम्बस्फोट, १२ जण ठार
3 ‘दहशतवाद आणि माओवाद ही काँग्रेस सरकारची देणं’
Just Now!
X