News Flash

पोस्टानं सॅनेटरी पॅड्स पाठवून अर्थमंत्री अरूण जेटलींचा निषेध

विद्यार्थिनी संघटनेकडून सॅनेटरी पॅड्सवर १२ टक्के जीएसटी लावल्याचा निषेध

अरुण जेटली

केरळमधील एका महाविद्यालयातल्या डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनेनं अर्थमंत्री अरूण जेटली यांना सॅनेटरी पॅड पोस्टानं पाठवून त्यावर लावलेल्या जीएसटीचा निषेध केला आहे. ‘स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया’नं ‘ब्लीड विदाऊट फिअर, ब्लीड विदाऊट टॅक्स’ असा संदेशही त्यावर लिहून पाठवला आहे. सॅनेटरी पॅडवर जीएसटी लावण्यात आल्यानं विद्यार्थिनींच्या संघटनेनं केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांना निषेध केला आहे.

इतकंच नाही तर या विद्यार्थीनी संघटनेनं अरूण जेटली यांच्या निर्णयाविरोधात केरळमध्ये आंदोलनही सुरू केलं आहे. या आंदोलनात स्थानिक आणि राज्य पातळीवरच्या नेत्यांनीही सहभाग घेतला आहे, तसंच मुली आणि महिलांचाही या आंदोलनात मोठा समावेश आहे. १ जुलैपासून देशात जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कराची नवी सुरूवात करण्यात आली. यामध्ये सॅनेटरी पॅडवर १२ टक्के जीएसटी आकारण्यात आला. याच निर्णयाचा केरळमध्ये कडाडून निषेध करण्यात येतो आहे.

तसंच महाराष्ट्रातही या निर्णयाचा निषेध करण्यात आला, ज्यानंतर महिला बचत गटांनी तयार केलेले सॅनेटरी पॅड जीएसटीमुक्त करण्यात आल्याची घोषणा अरूण जेटली यांनी केली. असं असलं तरीही सॅनेटरी पॅडवर १२ टक्के जीएसटी लावणं ही बाब देशातल्या बहुतांश महिलांना रूचलेली नाही.

अभिनेत्री कोंकणा सेन शर्मानेही या निर्णयाचा निषेध करत केंद्राच्या निर्णयावर टीका केली होती. जर शरीरातल्या बदलांवर आमचं नियंत्रण नाही मग तुम्ही कोणत्या निकषांवर सॅनेटरी पॅड्सवर १२ टक्के कर आकारालात ? असा प्रश्न उपस्थित केला होता. तसंच केंद्र सरकारनं कोणत्या निकषांवर सॅनेटरी पॅड्सचा समावेश ‘लक्झरी गुड्स’ अर्थात चैनीच्या वस्तूंच्या यादीत केला? असाही प्रश्न विचारला होता.

आता विद्यार्थी संघटनाही या निर्णयाविरोधात आवाज उठवताना दिसत आहेत. स्त्री वयात आल्यावर तिला येणारी मासिक पाळी ही नैसर्गिक बाब आहे. स्त्रिया आज पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असतात, त्यांच्या बरोबरीनं घराची जबाबदारी सांभाळत असतात, अशा सगळ्यात स्त्रियांना दर महिन्याला सॅनेटरी पॅड्सची गरज भासते. ही मुख्य गरज लक्षात घेता सरकारनं सॅनेटरी पॅड करप्रणालीतून वगळायला हवं होतं. मात्र तसं झालेलं नाही, त्याचमुळे आता नेटिझन्स, महिला यांच्या पाठोपाठ विद्यार्थिनीही आक्रमक झालेल्या दिसून येत आहेत. हा विरोध असाच वाढत राहिला तर सरकारला या निर्णयाबाबत फेरविचारही करावा लागू शकतो हे नक्की.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2017 9:06 pm

Web Title: gst girls activists post sanitary pads to arun jaitely
Next Stories
1 दोषी नेत्यांवर आजीवन बंदीबाबत तुम्ही गप्प का, सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला सवाल
2 जून महिन्यात देशाचा महागाई दर १.५४ टक्के
3 आम्हाला काश्मीरमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात समेट घडवून आणायचाय- चीन
Just Now!
X