08 July 2020

News Flash

विमानतळ, चित्रपटगृहांत एमआरपीपेक्षा अधिक पैसे घेणे पडू शकते महाग

याचा सर्वाधिक फायदा ग्राहकांना होईल.

एकच वस्तू वेगवेगळ्या किंमतीत विकणे आता चित्रपटगृहे, मॉल, विमानतळांना महागात पडू शकते. कारण सरकारी आदेशानुसार सर्व वस्तू या आता एमआरपीला (कमाल किंमत) विकावी लागतील. बहुतांश वेळा एकच वस्तू या ठिकाणी वेगवेगळ्या किंमतीवर विकल्या जातात. एक लिटर पाण्याची बाटली २० रूपयांना मिळते. तीच पाण्याची बाटली विमानतळावर ५० रूपयांना विकली जाते. असेच मॉल आणि चित्रपटगृहात पाहायला मिळते. या ठिकाणी एमआरपीहून अधिक मूल्य घेतले जाते. हा बदल वैधमापन शास्त्र २०११ च्या नियमानुसार करण्यात आला असून १ जानेवारी २०१८ पासून यात बदल लागू होईल.

ग्राहक विभागातील एका अधिकाऱ्याने याची माहिती देताना सांगितले की, आम्ही उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना या नियमांचे पालन योग्यरितीने व्हावा यासाठी खूप वेळ दिला आहे. या विषयावर विस्तृत चर्चा करून आम्ही या नियमांत बदल केला आहे. ग्राहकांना एकाच वस्तूसाठी वेगवेगळी किंमत द्यावी लागते. हे त्यांच्या बजेट बाहेरचे असते, असे ते म्हणाले. हा नियम लागू झाल्यानंतर कोणताही दुकानदार एकच वस्तू वेगवेगळ्या किंमतीला विकू शकणार नाही. याचा सर्वाधिक फायदा ग्राहकांना होईल.

हा नियम चित्रपटगृहे, मॉल आणि विमानतळांवर तर लागू होईल. पण हा नियम आम्हाला लागू होणार नसल्याचे रेस्तराँच्या मालकांचं म्हणणं आहे. आमचे रेस्तराँ जीएसटी अंतर्गत येते. आम्ही उत्पादक नाही पुरवठादाराच्या श्रेणीत येतो, असे रेस्तराँ मालकांनी म्हटले आहे. नुकताच जारी करण्यात आलेल्या निर्देशानुसार हा नियम रिटेल सर्व्हिसवर लागू होईल, असे राष्ट्रीय रेस्तराँ असोसिएशन ऑफ इंडियाचे सचिव राहुल सिंह यांनी म्हटले. सरकारने वस्तूची किंमत मोठ्या आकारात आणि अक्षरांत लिहिण्याच्या सूचना दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2017 10:24 am

Web Title: gst no any company will sell their same product in different price against mrp at cinema hall airport mall
Next Stories
1 जीएसटी: पंतप्रधान मोदींसाठी २०१९ च्या निवडणुकीत निर्णायक ठरणार ?
2 जीएसटी आपल्या घरात..
3 जीएसटीची गत नोटाबंदीसारखीच होईल..
Just Now!
X