05 July 2020

News Flash

राज्यांना ३६ हजार कोटींचा ‘जीएसटी’ परतावा

करोनाविरोधातील लढय़ासाठी राज्यांना खर्च करावा लागत आहे.

संग्रहित छायाचित्र

वस्तू व सेवा कराचा (जीएसटी) चार महिन्यांचा ३६ हजार ४०० कोटींचा परतावा अखेर गुरुवारी केंद्र सरकारने राज्यांना दिला. डिसेंबर २०१९ ते फेब्रुवारी २०२० या काळातील जीएसटीचा केंद्राकडून राज्यांना मिळणारा वाटा देण्यात आलेला नव्हता. करोनामुळे राज्यांची आर्थिक स्थिती दोलायमान असल्याने राज्य सरकारांकडून सातत्याने जीएसटी परताव्याची मागणी केली जात होती.

करोनाविरोधातील लढय़ासाठी राज्यांना खर्च करावा लागत आहे. मात्र, त्यांचा महसुलावर परिणाम झालेला आहे. राज्यांच्या आर्थिक अडचणींचा आढावा घेण्यात आला असून केंद्राने वस्तू व सेवा कराचा परतावा राज्यांना देण्याचा निर्णय घेतला, असे केंद्र सरकारच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

एप्रिल ते नोव्हेंबर २०१९ या आठ महिन्यांचा १ लाख १५ हजार ९६ कोटी रुपयांचा परतावा केंद्राने यापूर्वीच राज्यांना दिलेला आहे. २०१८-१९ मध्ये केंद्राने राज्यांना ६९ हजार २७५ कोटी तर २०१७-१८ मध्ये ४१हजार १४६ कोटी दिले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 5, 2020 12:40 am

Web Title: gst of rs 36000 crore should be refunded to the states abn 97
Next Stories
1 चोवीस तासांमध्ये ९ हजारहून अधिक रुग्ण
2 करोना नव्हे, अर्थव्यवस्था नष्ट झाली!
3 गुजरातमध्ये काँग्रेसच्या आणखी दोन आमदारांचे राजीनामे
Just Now!
X