03 March 2021

News Flash

‘कारभारात पारदर्शकतेसाठी जीएसटी महत्त्वपूर्ण पाऊल’

जीएसटीबाबत आयोजित कार्यक्रमात त्यांनी याला सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा दिल्याचे नमूद केले.

| July 23, 2017 03:07 am

वस्तू व सेवा कराबाबत अहमदाबाद येथे शनिवारी झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी व भाजप खासदर परेश रावल उपस्थित होते.

कारभारात पारदर्शकता येण्यासाठी वस्तू व सेवा कर (जीएसटी) हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. त्यामुळे उद्योगजगताने या ऐतिहासिक कर सुधारणेत सहभागी व्हावी, असे आवाहन केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांनी केले आहे.

जीएसटीबाबत आयोजित कार्यक्रमात त्यांनी याला सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा दिल्याचे नमूद केले. व्यापाऱ्यांनी जीएसटीबाबत धास्ती बाळगू नये. त्यांना कुठलाही त्रास होणार नाही, असे आश्वासन इराणी यांनी दिले. जीएसटीवरून व्यापाऱ्यांचे सुरत येथे आंदोलन झाले त्या पाश्र्वभूमीवर इराणींचे मत महत्त्वाचे आहे. काँग्रेस व्यापाऱ्यांमध्ये विनाकारण या मुद्दय़ावर गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2017 3:07 am

Web Title: gst program smruti irani central government
Next Stories
1 टोमॅटो विक्रेत्यांनी चोरी रोखण्यासाठी चक्क नेमले सुरक्षारक्षक
2 पनामा पेपर्स प्रकरणात नवाझ शरीफ यांची खुर्ची जाणार?
3 मुलगा होत नाही म्हणून आजीने नातीच्या गुप्तांगाला दिले चटके
Just Now!
X