News Flash

Good News! नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यात विक्रमी GST कलेक्शन

सलग सातव्या महिन्यात १ लाख कोटींच्या वर GST मिळाला

Good News! नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यात विक्रमी GST कलेक्शन

देशात करोनामुळे अनेक राज्यात लॉकडाऊन लावण्यात आला. काही राज्यांनी वाढत्या रुग्णांमुळे कडक निर्बंध लादले आहेत. त्यामुळे रोजगार आणि उद्योग धंद्यावर परिणाम झाला आहे. असं असलं तरी नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यात विक्रमी जीएसटी कलेक्शनची नोंद झाली आहे. सलग सातव्या महिन्यात १ लाख कोटीच्या वर जीएसटी मिळाला आहे. ही माहिती अर्थ खात्याने ट्विटरवर दिली आहे. २०१७ मध्ये जीएसटी लागू झाल्यानंतर हे सर्वात विक्रमी उत्पन्न आहे. त्यामुळे मागील सलग सात महिने एक लाख कोटींचे जीएसटी उत्पन्न मिळाल्याने केंद्र सरकारला मोठा आर्थिक दिलासा मिळाआहे.

एप्रिल २०२१ या महिन्यात एकूण १ लाख ४१ हजार ३८४ लाख कोटींचा जीएसटी मिळाला आहे. देशात जीएसटी लागू झाल्यापासून आतापर्यंतचा सर्वाधिक जीएसटी आहे. या जीएसटीत केंद्राचा २७,८३७ कोटी, राज्याचा ३५,६२१ कोटी, एकीकृत जीएसटी ६८,४८१ कोटी आहे. त्यात उपकर ९,४४५ कोटींचा आहे. मागच्या मार्च महिन्यात १ लाख २३ हजार ९०२ कोटींचा जीएसटी वसूल करण्यात आला होता.

ऑक्टोबर (२०२०) महिन्यात १,०५,१५५ कोटी, नोव्हेंबर (२०२०) महिन्यात १,०४,९६३ कोटी, डिसेंबर (२०२०) महिन्यात १,१५,१७४ कोटी, जानेवारी (२०२१) महिन्यात १,१९,८४७ कोटी, फेब्रुवारी (२०२१) १,१३,१४३ कोटी, तर मार्च (२०२१) या महिन्यात १,२३,९०२ कोटींचा जीएसटी वसूल करण्यात आला होता.

हॅलो डॉक्टर! काँग्रेस नेते राहुल गांधींचा रुग्णांसाठी पुढाकार

करोनाच्या पहिल्या लाटेनंतर जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागल्यानंतर जीएसटीच्या वसुलीत वाढ झाली होती. मात्र एप्रिल महिन्यापासून पुन्हा एकदा करोनाची दुसरी लाट आल्याने स्थिती गंभीर आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2021 3:40 pm

Web Title: gst revenue collected in the month of april 2021 is at a record high rmt 84
टॅग : Finance Ministry
Next Stories
1 धक्कादायक : दिल्लीत ऑक्सिजन अभावी एका डॉक्टरसह आठ रूग्णांचा मृत्यू
2 हॅलो डॉक्टर! काँग्रेस नेते राहुल गांधींचा रुग्णांसाठी पुढाकार
3 असंवेदनशील! करोनाग्रस्त महिलेचा रुग्णालयाबाहेर तडफडून मृत्यू; मृतदेह तीन तास गाडीतच होता पडून
Just Now!
X