लग्नात वधू-वराच्या डोक्यावर अक्षता टाकण्या इतकेच भोजनाचेही महत्व असते. चांगल्या दर्जाचे भोजन नसेल तर अनेकजण उघडपणे नाराजी बोलून दाखवतात. त्यामुळे वधू आणि वरपक्ष पाहुण्यांच्या भोजनात कुठली कमतरता राहणार नाही. सर्वांना चविष्ट, रुचकर भोजने मिळावे याकडे विशेष लक्ष देतो.

पश्चिम दिल्लीतील जनकपुरी भागात एका लग्नसोहळयात भोजनावरुन झालेला वाद हाणामारीपर्यंत जाऊन पोहोचला. लग्नाचा हॉल अखाडा बनला होता. लग्नाला आलेल्या पाहुणेमंडळींनी चक्क हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

जेवणाच्या दर्जावरुन हा सर्व वाद सुरु झाला. पाहुणे मंडळींना लग्नातले जेवण आवडले नाही. त्यावरुन भांडणाला सुरुवात झाली. भोजनावरुन पाहुणे मंडळी इतकी संतापली की, त्यांनी हॉटेलमधील सामानाची तोडफोड करत कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली. हॉटेलमध्ये प्लेटसचा खच पडला असून हॉटेलमधल्या कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करताना लोक व्हिडिओमध्ये दिसत आहेत.