News Flash

सपना चौधरीचं गाणं वाजवलं नाही म्हणून फोडलं डोकं

माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि अटकेची कारवाई केली

हरयाणामधील सुप्रसिद्ध गायिका आणि डान्सर सपना चौधरीच्या कार्यक्रमांमध्ये गोंधळ होणं आता नेहमीचं झालं आहे. मात्र आता तिच्या गाण्यावरुनही भांडणंही होऊ लागली आहेत. रविवारी रात्री एका पार्टीत सपना चौधरीचं गाणं वाजवण्यावरुन झालेल्या भांडणात रेस्टॉरंटच्या मालक आणि वेटरला मारहाण करत डोकं फोडल्याची घटना समोर आली आहे. नोएडामधील सेक्टर 38अ मधील गार्डन गॅलरी मॉलमध्ये ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रशेखर चौहान यांनी पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गार्डन गॅलरी मॉलमधील अलीबाबा रेस्टॉरंट बूक केलं होतं. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास चंद्रशेखर आपलं कुटुंब आणि मित्र असे एकूण 20 जणांना सोबत रेस्टॉरंटमध्ये पोहोचले. तिथे ड्रिंक केल्यानंतर सर्वांनी नाचण्यास सुरुवात केली. यावेळी सर्वांनी सपना चौधरीचं ‘तेरी आख्या को यो काजल’ गाणं वाजवण्याची मागणी केली. डीजेने मात्र आपल्याकडे हे गाणं नसल्याचं सांगितलं.

यानंतर लोकांनी सपना चौधरीचं दुसरं गाणं वाजवण्याची मागणी केली. पण डीजेने ते गाणंही आपल्याकडे नसल्याचं सांगितलं. आरोप आहे की, यामुळे पार्टीत आलेले सर्वजण भडकले. आपण इतके पैसे देऊन हे रेस्टॉरंट बूक केलं. यानंतरही आपलं आवडतं गाणं का वाजवलं जात नाही आहे अशी विचारणा सगळे करु लागले.

झालेला गोंधळ पाहून रेस्टॉरंटचे मालक हरीश आणि वेटरने हस्तक्षेप केला. पण नशेत धुत असलेल्या लोकांनी त्यांच्या डोक्यावर दारुची बाटली फोडली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि अटकेची कारवाई केली. न्यायालयात हजर केलं असता कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आली. चौघांविरोधात तक्रार आली होती. त्या सर्वांना अटक करण्यात आली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 8, 2019 11:01 am

Web Title: guests broke restaurant owner head for not playing sapna chaudhary song
Next Stories
1 CBI Vs CBI: सरकारला हादरा, आलोक वर्मांना रजेवर पाठवण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाकडून रद्द
2 दिल्ली-मुंबई विमानात छेडछाड, ६५ वर्षीय उद्योगपतीला अटक
3 Rafale Deal: राहुल गांधींना भाजपाची शिकवणी
Just Now!
X