07 March 2021

News Flash

गिनिज बुकात नाव नोंदविलेल्या शैलंद्रनाथचा स्टंटबाजी करताना मृत्यू

गिनिज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपल्या स्टंटबाजीसाठी नाव नोंदविलेल्या शैलेंद्रनाथ रॉयने सिलिगुडीमध्ये तिस्ता नदीवर स्टंटबाजी करण्याच्या प्रयत्नात प्रेक्षकांसमोरच जीव गमवावा लागल्याची घटना घडली. शैलेंद्रनाथने यापूर्वी केसांच्या

| April 29, 2013 04:07 am

गिनिज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपल्या स्टंटबाजीसाठी नाव नोंदविलेल्या शैलेंद्रनाथ रॉयने सिलिगुडीमध्ये तिस्ता नदीवर स्टंटबाजी करण्याच्या प्रयत्नात प्रेक्षकांसमोरच जीव गमवावा लागल्याची घटना घडली. शैलेंद्रनाथने यापूर्वी केसांच्या शेंडीच्या सहाय्याने नदीवरून अंतर पार करत गिनिज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले होते. हा विक्रम मोडीत काढण्याच्या इच्छेने त्याने रविवारी तिस्ता नदीवरील पुला शेजारी लांब दोर बांधली. या दोरीला आपले केस बांधून त्याने पूल पार करण्यास सुरवात केली. यात एका तारेत तो अडकला. तेथून त्याला हलतासुद्धा येत नसल्याने स्वतःला सोडविण्याच्या प्रयत्नात तो आणखी अडकला व याचवेळी त्याचा श्वास बंद पडला आणि त्याचा मृत्यू झाला. घटनास्थळी लोकांची गर्दी त्याचा विश्वविक्रम पाहण्यासाठी जमली होती. मात्र, कोणीही त्याला वाचवू शकले नाही. तेथे कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याचेही पोलिसांनी सांगितले. अखेर पोलिसांनीच त्याला खाली उतरविले आणि उपस्थित डॉक्टरांनी तपासणी केली असता त्याचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 29, 2013 4:07 am

Web Title: guinness record holder dies performing stunt
Next Stories
1 कर्नाटकातील ढिसाळ कारभारामुळे उद्योजकांची पुण्याला पसंती – पंतप्रधानांची भाजपवर टीका
2 सरबजितच्या अखेरच्या घटका
3 मोदी यांचे पुन्हा राहुल गांधींवर टीकास्त्र
Just Now!
X