15 January 2021

News Flash

गुजरातमध्ये दोन ट्रकची धडक होऊन भीषण अपघात, ११ जणांचा मृत्यू

१७ जण जखमी; अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी

गुजरातमधील बडोदा येथील वाघोडिया क्रासिंग हायवेवर आज(बुधवार) पहाटे दोन ट्रकचा भीषण अपघात घडला. यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला असून, १७ जण जखमी झाले आहेत.

अपघातामधी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यता आले आहे. पहाटे ४ वाजेच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. या भीषण अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

या दुर्घटनेबद्दल गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी ट्विट करून म्हटले की, ”बडोदा  जवळ रस्ते अपघातामुळे मृत्यू झाल्याचे ऐकून दुःख होत आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. जी लोकं जखमी आहेत ते लवकरात लवकर बरे व्हावेत. तसेच, मृत्यू झालेल्यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी मी प्रार्थना करतो.”

तर, गुजरातमधील सुरेंद्रनगर जिल्ह्यातील कोठारिया गावाजवळ आज सकाळी चालकाचे वाहनावरील नियंत्रण ढळल्याने, चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याचेही समोर आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2020 10:26 am

Web Title: gujarat 11 people died 17 injured in a collision between two trucks msr 87
Next Stories
1 करोनानंतर आता ‘चापरे व्हायरस’ची दहशत; या विषाणूने साथीचं रुप धारण केल्यास…
2 देशभरात २४ तासांत ४४ हजार ७३९ जण करोनामुक्त, ३८ हजार ६१७ नवे करनोबाधित
3 अपहरण, बलात्कार आणि ब्लॅकमेल; सुसाईड नोट लिहून पीडितेने घेतला गळफास
Just Now!
X