News Flash

सात वर्षांच्या मुलीला तंबाखू आणायला सांगितले, नंतर निर्जनस्थळी नेऊन केला बलात्कार

नराधमाने मुलीला चाकूचा धाक दाखवून ठार मारण्याची धमकी देखील दिली. तिथून परतल्यावर पीडितेने रडत रडत आईला घडलेला प्रकार सांगितला.

प्रतिकात्मक छायाचित्र

गुजरातमधील सुरत येथे सात वर्षांच्या मुलीवर परिसरात राहणाऱ्या २१ वर्षांच्या नराधमाने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. विक्की उर्फ विकासकुमार राजवंशी असे या आरोपीचे नाव असून तो गेल्या दोन वर्षांपासून पीडित मुलीच्या घराजवळ राहत होता.

सुरतमधील कडोदरा येथे विक्की राहतो. सोमवारी संध्याकाळी विक्की हा कामावरुन घरी परतला. यादरम्यान त्याला घराजवळ सात वर्षांची मुलगी खेळताना दिसली. त्याने पीडित मुलीला ५० रुपये दिले आणि दुकानातून तंबाखू आणायला सांगितले. पीडित मुलगी तंबाखू घेऊन आली असता त्याने मुलीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने निर्जनस्थळी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला.

नराधमाने मुलीला चाकूचा धाक दाखवून ठार मारण्याची धमकी देखील दिली. तिथून परतल्यावर पीडितेने रडत रडत आईला घडलेला प्रकार सांगितला. तिने तातडीने मुलीला स्थानिक सरकारी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालय प्रशासनाने या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

स्थानिक पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले. यातील एका कॅमेऱ्यात नराधम विक्की पीडित मुलीसोबत जाताना दिसला. पोलिसांसाठी हा महत्त्वाचा पुरावा होता. अखेर बुधवारी सकाळी पोलिसांनी वरेली बसस्थानकाजवळून विक्कीला अटक केली. विक्कीने पोलीस चौकशीत गुन्ह्याची कबूली दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 21, 2019 2:31 pm

Web Title: gujarat 21 year old arrested for rape of seven year old girl in surat
Next Stories
1 मद्यपी पतीची पत्नीने केली हत्या, मृतदेहाचे तुकडे करुन घरातच पुरले
2 सामना सुरु असताना २२ वर्षीय क्रिकेटपटूचा मैदानात मृत्यू
3 पुलवामा हल्ल्याची चौकशी केल्यास बड्या नेत्यांची पोलखोल होईल : सपा नेता
Just Now!
X