22 October 2020

News Flash

धक्कादायक! चार वर्षांच्या मुलावर शिक्षकाने केले स्कूल बसमध्ये लैंगिक अत्याचार

राजकोटमधील खासगी शाळेतील नर्सरीत पीडित मुलगा शिकतो. सोमवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास संदीपने पीडित मुलाला गाठले.

प्रतिकात्मक छायाचित्र

गुजरातमधील राजकोट येथे शाळेतील शिक्षकाने चार वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. संदीप दानीधरिया (वय २६) असे या नराधम शिक्षकाचे नाव असून पीडित मुलावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

राजकोटमधील खासगी शाळेतील नर्सरीत पीडित मुलगा शिकतो. सोमवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास संदीपने पीडित मुलाला गाठले. यानंतर त्याने मुलाला शाळेच्या मैदानात पार्क केलेल्या बसमध्ये नेले. तिथे त्याने मुलावर लैंगिक अत्याचार केले. घरी परतल्यावर मुलाने पोटात दुखत असल्याचे सांगितले. पालकांनी त्याला तपासणीसाठी डॉक्टरकडे नेले असता त्याच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले.

घाबरलेल्या पालकांनी शाळेत धाव घेतली. त्यांनी मुख्याध्यापकांना घडलेला प्रकार सांगितला. मुख्याध्यापकांनी पीडित मुलाला शाळेतील शिक्षक व अन्य कर्मचाऱ्यांचे फोटो दाखवले. या आधारे मुलाने नराधम शिक्षकाची ओळख पटवली. यानंतर सोमवारी रात्री पीडित मुलाच्या पालकांनी पोलिसांकडे शिक्षकाविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी भारतीय दंड विधानातील कलम ३७७ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी पुरावे गोळा करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची तपासणीही सुरू केली आहे. संदीप हा गणिताचा शिक्षक असून तो शाळेतील पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना शिकवतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2018 2:37 pm

Web Title: gujarat 4 year old boy sodomized by mathematics teacher in rajkot arrested
Next Stories
1 मुकेश अंबानींची एका दिवसाची कमाई पाहून थक्क व्हाल
2 ५०० रुपये परत न केल्याने मित्राच्या बायकोसोबत केलं लग्न
3 सुप्रीम कोर्टात यूपीएच्या ‘आधार’चा विजय, एनडीएचा पराभव; अभिषेक सिंघवींचा दावा
Just Now!
X