गुजरात आणि हिमाचल प्रदेशात भाजपला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आनंद व्यक्त केला आहे. ‘जो जीता वही सिकंदर’ असे म्हणत अगदी मोजक्याच शब्दात इराणींना पक्षाचे अभिनंदन केले. या दोन्ही राज्यांमध्ये भाजपला मिळालेले हे यश ही फार आनंददायी बाब असून, हा विकासाचाच विजय आहे, असे त्या म्हणाल्या.

काँग्रेससोबत असलेल्या अटीतटीच्या लढतीविषयी प्रश्न विचारला असता इराणी म्हणाल्या, ‘हा प्रत्येक मतदार संघात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा विजय आहे. त्यांच्या योगदानामुळे, मेहनतीमुळेच हे सर्व साध्य झाले आहे. इतकेच नव्हे तर हा विकासावर विश्वास असणाऱ्या जनतेचा विजय आहे. शेवटी जो जीता वही सिकंदर…’

Gujarat, Himachal Pradesh Election results 2017 : ढोकळा, फाफड्याची चव चाखत भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

हिमाचल प्रदेश आणि गुजरात निवडणुकांच्या निकालाचे चित्र आता स्पष्ट झाले असून, त्यास सत्ताधारी भाजप पक्षाने काँग्रेवर सरशी मिळवली आहे. पण, काँग्रेसला क्लीन स्वीप देण्याचा दावा करणाऱ्या भाजपला कुठेतरी धक्का पोहोचल्याची बाबही तितकीच लक्षवेधी ठरते आहे. सध्या या सर्व वावातावरणावर राजकीय नेत्यांनी व्यक्त होण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये आपच्या कुमार विश्वास यांच्या नावाचाही समावेश आहे. विश्वास यांनी ट्विट करत भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचे अभिनंदन करत या निकालांमधून सर्वांनीच सकारात्मक धडा घ्यावा असा संदेश दिला.