गुजरातमधील शाळांमध्ये सध्या विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रीया सुरु असून विद्यार्थी आणि पालकांना प्रोत्साहन देण्यासाठी शाळांमध्ये प्रवेशोत्सवदेखील साजरा केला जात आहे. शाळेत विद्यार्थ्यांना सरकारतर्फे शैक्षणिक साहित्य पुरवले जात आहे. मात्र यातील दप्तरांवर चक्क अखिलेश यादव यांचे छायाचित्र छापून आल्याचा प्रकार समोर आला आहे.

गुजरातमधील उदेपूर जिल्ह्यातील संखेडा येथे सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रशासनातर्फे दप्तर देण्यात आले आहे. या दप्तरांवर उदयपूर जिल्हा पंचायत असा स्टीकर लावण्यात आला होता. मात्र हा स्टीकर फाडल्यास किंवा ओल्या कापडाने पुसल्यास त्याखाली उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे छायाचित्र असल्याचे उघड झाले. अखिलेश यादव यांचे छायाचित्र बघून सर्वांनाच धक्का बसला.

Loan guarantee only to those who show vote power is Mahayuti condition for sugar factory leaders
‘मत’शक्ती दाखविणाऱ्यांनाच कर्जहमी; महायुतीची साखर कारखानदार नेत्यांसाठी अट?
Satej Patil criticize Sanjay Mandlik says MPs do not meet even for a simple letter
साध्या पत्रासाठीही खासदार भेटत नाहीत; सतेज पाटील यांची संजय मंडलिक यांच्यावर टीका
Aap with iNdia Aghadi
अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत महारॅलीचंं आयोजन!
Sale of Sangli Airport land during Uddhav Thackeray was cm says Industries Minister Uday Samant
सांगली विमानतळाच्या जागेची विक्री ठाकरे सरकारच्या काळात – उद्योगमंत्री उदय सामंत

उदेपूर जिल्ह्यात १२ हजार दप्तरचे वाटप झाले असून या सर्व विद्यार्थ्यांच्या दप्तरवर अखिलेश यांचेच छायाचित्र असावे अशी शक्यता आहे. उत्तर प्रदेश सरकारचे हे दप्तर गुजरातमध्ये कसे आले असा प्रश्न स्थानिक विचारत आहे. तर शिक्षण विभागाने यावर प्रतिक्रिया दिली आहे. सुरतमधील एका कंपनीला दप्तराचे कंत्राट देण्यात आले आहे. ई-टेंडरिंगच्या माध्यमातून ही प्रक्रिया राबवण्यात आली होती असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून १२ हजार पैकी ५ टक्के दप्तरांवरच अखिलेश यांचे छायाचित्र होते असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.