27 November 2020

News Flash

गुजरात पोटनिवडणूक: भाजपा कार्यकर्त्यांवर मतांसाठी पैसे वाटपाचा आरोप, चौकशीचे आदेश

भाजपा कार्यकर्ते मतदारांना पैसे वाटप करत असल्याचे दोन व्हिडीओ....

(एक्स्प्रेस फोटो - भूपेंद्र राणा)

गुजरातच्या कारजान विधानसभा मतदारसंघात मतांसाठी पैसे वाटप केल्याच्या आरोपाप्रकरणी रिटर्निंग अधिकाऱ्याने चौकशीचे आदेश दिले आहेत. काँग्रेस उमेदवार किर्तीसिंह जाडेजा यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार अक्षय पटेल यांच्यावर मतांसाठी पैसे वाटल्याचा आरोप केला आहे. अक्षय पटेल भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. गुजरातमध्ये आज विधानसभेच्या आठ जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. यात वडोदऱ्यातील कारजान विधानसभा मतदारसंघाचाही समावेश आहे.

जाडेजा यांचे निवडणूक एजंट उपेंद्रसिंह राणा यांनी या प्रकरणी तक्रार नोंदवली आहे. निवडणुकीआधी भाजपा कार्यकर्ते मतदारांना पैसे वाटप करत असल्याचे दोन व्हिडीओ यामध्ये आहेत. अक्षय पटेल आणि व्हिडीओ मध्ये दिसलेल्या भाजपा कार्यकर्त्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी राणा यांनी तक्रारीत केली आहे. दोन बुथवरील मतदान रद्द करण्याची त्यांनी मागणी केली आहे.

निवडणूक विभागाने तक्रारीची दखल घेतली असून आरोपाची चौकशी सुरु केली आहे, असे १४७ कारजान विधानसभा मतदारसंघाचे रिटर्निंग अधिकारी के.आर.पटेल यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले. “आम्ही चौकशी सुरु केली आहे. हा गंभीर विषय आहे. आज सकाळी आम्हाला तक्रार मिळाली” असे पटेल यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 3, 2020 5:49 pm

Web Title: gujarat bypoll inquiry ordered after videos show bjp workers distributing cash for votes in karjan dmp 82
Next Stories
1 नितीशकुमार यांच्या सभेत फेकण्यात आला दगड
2 ट्रम्प यांच्या विजयासाठी हिंदू सेनेतर्फे मंदिरात विशेष पूजा, होम
3 बिहार निवडणूक : “धर्म, जातीपातीचं जाऊ द्या बेरोजगारीच्या प्रश्नावर या आणि…”
Just Now!
X